________________
(२६९)
साठी अशुभ अथवा असत्च्या परित्यागाचे कथन केले जाते. ते 'शुभ अथवा
महणामध्ये विधिमुखतेला सुदृढ बनविते. म्हणूनच प्रथम अप्रशस्त भावनेचे वर्णन आहे आणि नंतर प्रशस्त भावनेचे. जरी प्रशस्तता प्राप्त झाल्यावर अप्रशस्तता नष्ट ते तरीही व्यवहारामध्ये ह्याच्या वर्णनाची आवश्यकता आहे.
आराधक भवी जीव आगमज्ञानाच्या प्रभावाने अशुभस्वरूपाला सोडून शुभ थेला प्राप्त होतो आणि क्रमाने कर्म मळरहित होऊन शुद्ध होतो. जसे सूर्य उदित होण्यापूर्वी प्रथम प्रभातकाळरूपी संध्याला प्राप्त होतो, नंतर तो संपूर्ण अंधकाररहित होतो, त्याचप्रमाणे आराधक पण प्रथम अंधकारासारख्या अशुभ मधून निघून शुभ भावाला प्राप्त होतो व नंतर कर्म मळ रूपी अंधकाराने रहित होतो, शुद्ध होतो.
आत्मानुशासनमध्ये ग्रंथकाराने जीवत्म्याच्या क्रमिक विकासाचे जे वर्णन केले । आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. अशुभ मधून शुभ व शुभ मधून शुद्ध बनण्याची भाव यात्रा हाच आपला मुख्य विषय आहे.
अशुभ उपयोगाने जीवाला नरकगती आणि तिर्यंच गती मिळते. शुभोपयोगाने देवगती व मनुष्य गती मिळते, आणि शुद्धोपयोगाने मोक्षाची प्राप्ती होते.१६६
__अशुभ भावनेत आपण पाहिले की मनुष्यामध्ये थोडीसुद्धा विचाराची मलिनता आली तर दर्गती होते म्हणन विचार शभ अथवा शद्ध ठेवणे आवश्यक आहे. 'कंटकात कंटकमुद्धरेत्' काट्याने काटा काढण्याची नीती साधना क्षेत्रात पण लागू होते. चित्ताला अशुभ भावनेने मुक्त करणे हे साधकाचे लक्ष्य असते. परंतु शुद्ध आत्मस्वरूपाची प्राप्ती प्रथम प्रयत्नातच होणे कठिण आहे. कारण अनादिकाळापासून जे कुसंस्कार पडले आहेत, त्याचे निर्मूलन एकदम होऊक शकत नाही. त्याला मंद करण्यासाठी नव्या भावनांची सृष्टी करावी लागते. त्या नव्या भावना यथार्थ असतात त्याचा अशुभ भावनेवर प्रभाव पडतो आणि त्याचे निर्मूलन होऊ लागते.
भावनेने मन भावित करण्यासाठी ज्ञान व अभ्यास आवश्यक आहे. अशुभ भावनेचे ज्ञान झाल्यावर त्याच्या संस्कारांना कमी करण्यासाठी सतत अभ्यास करावा लागतो, जसे लहान मुले माती खाऊ नये म्हणून त्याच्या हातात चॉकलेट देतात, त्याचप्रमाणे बाल साधकाने अशुभ भावनेत आत्म्याचे पतन करू नये म्हणून पूर्वाचार्यांनी, सतानी लेखकांनी “शुभ भावने'चे चॉकलेट आपल्याला दिले आहे. ह्या शुभ भावनेचे चाकलेट मात्र तोपर्यंतच आहे, जोपर्यंत आपल्याला शुद्धात्मभावनेच्या मिष्ठांनाचे ज्ञान नाही.
M