________________
(२६७)
आवश्यकता ? ह्या दोहोंमध्ये काय फरक आहे ? ज्ञानाप्रमाणे दर्शनाच्या इत्यादी संबंधीसुद्धा अशाच प्रकारे शंका करतो. त्याचबरोबर तो परतीर्थी अन्य यायींच्या समृद्धीला अथवा वैभवाला पाहून मोहग्रस्त होतो. हे सर्व 'स्वमोहा'च्या पति समाविष्ट आहे. ही आत्ममोहावस्था त्याज्य आहे असे सतत चिंतन केले पाहिजे.
५) परमोह - उपरोक्त वर्णित स्वमोहाचा संबंध आपल्या आत्म्याबरोबर आहे. करणारा मोहमूढ होऊन स्वतःला पतनाच्या मार्गावर नेतो. परंतु परमोह भावनेची गोष्ट वेगळी आहे.
जी व्यक्ती 'पर' अर्थात अन्य प्राण्याला मोहमूढ करते त्याच्या चित्तामध्ये 'विभ्रम' अथवा 'भ्रांती' उत्पन्न करते, मग ते सदभावनेने किंवा सत्याने असो किंवा कैतव अर्थात मिथ्या परिकल्पना किंवा कपटाने दुसऱ्याच्या मनात विभ्रम उत्पन्न करते, ती 'पर मोह' भावना आहे. त्याने बोधी अथवा सम्यकत्वाचा नाश होतो. अबोधी किंवा मिथ्यात्व उत्पन्न होते. अशी दूषित भावना मनात येवू नये असे पुन्हा पुन्हा चिंतन करणे म्हणजे 'परमोह भावना' आहे.
ह्याचे थोडक्यात वर्णन करताना शिवार्याचार्य लिहितात की जो मिथ्यादर्शन आणि अविरतीचा उपदेश करतो. हिंसाइत्यादी कार्य केल्याने पाप लागत नाही आणि दुर्गती पण होत नाही. अशाप्रकारे पापकार्यात पण भयरहित करून त्यात प्रवृत्त होण्यासाठी प्रेरित करतो, तो सम्मोहभावनेने भावित होतो. हा एक उन्मार्ग उपदेशक आहे. उन्मार्ग उपदेशक इथेच थांबत नाही. पुढे अजून पापमय उपदेश देतो की शास्त्रात जो आहार दानाचा उपदेश आहे ते दान. जसे पापाचे कारण नाही तसेच यज्ञामध्ये प्राण्याची हिंसा करणे पण पाप नाही, यज्ञासाठी पशू ब्रह्मदेवाने उत्पन्न केले आहे. त्यामुळे यज्ञ करणारा, करविणारा आणि पशू हे सर्व मंत्राच्या माहात्म्याने स्वर्गात जातात. अशा विपरीत उपदेशाने सम्मोही देवात उत्पन्न होतो. संवर, निर्जरा आणि संपूर्ण कर्माचा नाश करण्यासाठी.
सम्यज्ञान, दर्शन, चारित्रच आत्म्याला शरण रूप आहे. ह्यालाच आचार्यांनी मोक्ष मागे सांगितले आहे. अथवा सत्य मार्गाला जो दूषित करतो तो मार्गदूषक आहे. रत्नत्रयाच्या विरुद्ध आचरण करणारा, पदार्थाच्या योग्य स्वरूपाला न जाणणारा मोहित होऊन ज्या वामध्ये कामविकार आणि रागभावाची तीव्रता आहे, अशा कृत्सित देवात उत्पन्न होतो. १६३