________________
(२६६)
यांच्या बोधीबीजाचा उपहास करते म्हणून अयोग्य आहे. ह्याच्या परीत्यागाचे व मनामध्ये दृढ होणे हे अपेक्षित आहे.
२) मार्गदूषणा - ज्ञान इत्यादी तीन प्रकारच्या पारमार्थिक मार्गाला आपल्या मगर कल्पित तर्क-वितर्काने दूषित करणे, त्यांच्या स्थानी विपरीत सिद्धांताची स्थापना पारमार्थिक मार्गावर चालणाऱ्या साधूवर दोषारोपण करणे हे सर्व मार्गदूषणेच्या अंतर्गत
आहे. असे करणारे अबोध आणि तत्त्वज्ञानशून्य तथाकथित पंडित, ज्ञानी, आपल्या साहित्याचा अभिमान करणारे दुर्विग्ध-गर्पोद्धत, अहंकारी पुरुष, पारमार्थिक मार्गाचा घात कण्याचा दुष्प्रयत्न करतात. ते ह्या 'मार्गदूषणा' नामक भावनेने दुष्प्रेरित राहतात ही भावना मनामध्ये विकृती आणते ती संयम मार्गामध्ये सर्वथा बाधक असते.१६०
३) मार्गविप्रतिपत्ती - उपरोक्त ज्ञानादी पारमार्थिक मार्गाला न जाणता निर्दोषी व्यक्तीवर सुद्धा दोषारोपण करून आपल्या मिथ्या विकल्पाने आंशिक रूपाने विकृत करणे, शाखाचा आशय न समजता जमालीप्रमाणे मार्गाला दूषित दाखवून विपरीत मार्गाचा स्वीकार करणे ही मार्गविप्रतिपत्ती आहे.१६१
विप्रतीपत्तीचा अर्थ 'शंका' असा होतो. जमालीला अशाप्रकारे शंका निर्माण झाली । होती. त्याने भगवान महावीरांद्वारे उपदिष्ट "क्रियमाणं कृतं' यांच्या सिद्धांताला चुकीचे ठरवून "कृतमेव कृतं" ह्या सिद्धातांचाच स्वीकार केला, आणि वेगळा संप्रदाय चालवू • लागला. जैन शास्त्रामध्ये ह्याला 'निह्नव' म्हणले आहे. निह्नवत्वामध्ये मार्ग विप्रतिपत्तीमुळेच व्यक्ती पतीत होतो.
___४) 'स्व' मोह - स्वत: मोहमूढ होणे, जेव्हा बुद्धी भावोपहत होते अर्थात शंका इत्यादींच्या परिणामस्वरूपी उपहत अथवा दूषित होते, ती व्यक्ती मोहमूढ होते. ज्ञानादींमध्ये व्यामोह होतो, अयुक्तीयुक्त शंका करू लागतो. तो असे सांगतो की जर परमाणू इत्यादी सर्व रूपी द्रव्याशी संबंधित विषय अवधिज्ञानाद्वारे ग्रहण होतात, त्याने अवधिज्ञानाची असंख्य रूपे होतात तर मग मनःपर्यवज्ञानाची काय आवश्यकता आहे ? हा ज्ञानमूलक 'स्व-मोह' आहे. अर्थात आपल्या व्यामूढतेमुळे व्यक्तीमध्ये अशाप्रकारे विपरीत मनःस्थिती उत्पन्न होते.१६२
ज्ञानाप्रमाणे चारित्र्यामध्येही व्यामोहामुळे अयुक्तीयुक्त कथन करू लागतो. ज्याप्रमाणे सामायिक चारित्र्य सर्व सावद्यनिवृत्तीयुक्त आहे. म्हणजे त्यामध्ये सर्व पापयुक्त कमांचा परित्याग होतो तर मग छेदोपस्थापनीय चारित्र्य सुद्धा तसेच वीरतीरूप आहे.