________________
क्लेश करणे ज्याचा स्वभाव आहे आणि तप इ. शुभ क्रियासुद्धा कलहाने करतो त्याचा कोप पुढील जन्मात पण राहातो तो असुर गतीत जातो. तप करतो पण परिग्रहाचा नौह करतो, निर्दयपणे प्राण्यांना दुःख देतो याचा त्याला पश्चाताप ही होत नाही. असा माणूस असुरगतीमध्ये जातो. १५६
असुर म्हणजे राक्षस, दैत्य. लाक्षणिक भाषेत क्रोधाला सुद्धा असुर म्हटले गेले
आहे.
(२६५)
आसुरतं न गच्छेन्ना१५७ कोणावरही क्रोध करू नका. कारण क्रोध आल्यावर माणूस राक्षसाप्रमाणे क्रूर आणि अविवेकी होतो.
'मूलाचार'मध्ये वट्टकेराचार्य लिहितात- दुष्ट, क्रोधी, मानी, मायाचारी, तप व चारित्रपालन करण्यात, क्लेशयुक्त परिणाम असलेले, बैर-शत्रुत्व निर्माण करण्यातच ज्याने आपले जीवन घालवले त्या व्यक्तीचे या भावनेतच जर मृत्यू झाला तर त्याचा असुर जातीच्या अंबरीष भवनवासी देव योनीत जन्म होतो.
ज्याच्या हृदयात कृपा, अनुकंपा नाही. त्याला सम्यक्त्व रत्न कधीच प्राप्त होऊ शकत नाही. सम्यक्त्वाची जी पाच लक्षणे आहेत त्यातील एक लक्षण अनुकम्पा आहे. अनुकंपा रहित माणूस असूर आहे. अनुकंपा असलेला माणूस देवतुल्य आहे. असुर म्हणजे आसुरी भावना असणारा.
संमोही भावना
संशयामुळे बुद्धी दूषित होणे म्हणजे 'संमोह' होय. संमोहाने चित्त विमूढ होते. त्यामुळे ज्ञान, चारित्र्य इत्यादींमध्ये चित्त लागत नाही. तो व्यक्ती दर्शनांतर, मतांतर आणि वाचनांतर यामध्येच विश्वास करू लागते. अन्ततीर्थकांची अनेक प्रकारची समृद्धी पाहून तो मोहित होतो. अशी स्थिती मानवाला सत्य धर्मापासून विचलित करते. ती व्यक्ती स्वधर्मामध्ये स्थिर होऊ शकत नाही. म्हणून त्याचे चिंतन करणे हे त्यापासून वाचण्याचे साधन आहे.
संमोही भावनेचे प्रकार १) उन्मार्ग देशना; २) मार्गदूषणा; ३) मार्गविप्रतीपत्ती; १) स्वमोह (स्वयं मोहमूढ होणे); ५) पर- मोह दुसऱ्यांना मोहमूढ करणे. १५८
-
१) उन्मार्ग देशना - ज्ञान, दर्शन, चारित्र्य इत्यादी जे पारमार्थिक मार्ग सांगितले आहेत, त्यांच्या विपरीत उपदेश देणे म्हणजे 'उन्मार्ग देशना' आहे. ही आपल्या स्वतःच्या
11-5-02