________________
(२५७)
होईल असे वचन, व्यर्थ चेष्टा, असभ्यवचन, हसता-हसता बोलून दुसऱ्यांना मित करणे इत्यादिला कांदी भावना आहे, असे म्हटले आहे.
या सर्व विवेचनावरून असा निष्कर्ष निघतो की -
अती हसणे, अश्लील गोष्टी बोलणे, व्यंग्यात्मक वचन बोलणे, द्रौपदीच्या एका जगात्मक वाक्याने महाभारत घडले, म्हणून असे वचन अशुभ भावनेने दूषित आहेत.
कामशास्त्राच्या गोष्टी सांगून संसार वाढविणे, द्रवशीलता म्हणजे दुःशीलता आणि दसरा अर्थ भरभर बोलणे, चालणे, प्रत्येक काम अतिचपलतेने करणे म्हणजे द्रवशीलता.
भजन, भोजन आणि भाषण हे तीन कार्य सावकाश करावीत. वाचाळतारहित, उद्वेगरहित, शांतपणे, धीरगंभीर आवाजात बोलावे अतिघाई करण्याने मनाची अस्थिरता, चंचलता प्रदर्शित होते.
- अशा प्रकारच्या कन्दर्प भावनेचे आचरण करणारा श्रमण जर आलोचना न करता मृत्यू पावला तर स्वर्गात गेला तरी कन्दी देव बनतो. कंदी देव म्हणजे हलक्या प्रतीचा. हलक्या प्रतीचा. हलक्या प्रतीच्या देवांना तेथेही विदुषकाचेच काम करावे लागते. अव्रती लोक मृत्यूनंतर तिर्यंच गतीमध्ये उत्पन्न होतात.
देव किल्विषी भावना बृहत्कल्प भाष्यामध्ये दुसरी भावना 'देवकिल्विषी' आहे. परंतु उत्तराध्ययन सूत्रात तिसऱ्या भावनेचे नाव 'किल्विषी' आहे. दोन्ही भावनांचे तात्पर्य जवळजवळ सारखेच आहे. किल्विषी हास्यपरिहास्ययुक्त देवांच्या भावनात्मक वृत्तीच्या अनुरूप तुच्छ वृत्ती किवा तुच्छ भाव हे ह्या भावनेचे स्वरूप आहे, लक्षण आहे. बृहत्कल्पवृत्तीमध्ये ह्याचे विश्लेषण करताना स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे की जे देव पापी वृत्तीचे आहेत, चाडाळाप्रमाणे ज्यांची हीनवृत्ती आहे त्यांना किल्विषी म्हणतात. त्यांची कार्ये अधम असतात. अशा अधम आणि निरर्थक कार्याबरोबर जोडलेल्या भावनेला 'देवकिल्विषी' म्हटले जाते.
देवर
किल्विषी भावनेचे प्रकार - १) 'श्रुता'चा अवर्णवाद; २) सर्वज्ञ आणि वलीचा अवर्णवाद, ३) धर्माचार्यांचा अवर्णवाद; ४) साधूंचा अवर्णवाद; ५) मायावाद; है पाच पक्ष आहेत. १३४
१) 'श्रुत'चा अवर्णवाद - प्रवचनाच्या अवहेलनेची पर्वा न करता असे बोलणे