________________
(२५८)
हो पइजीवनीकाय' यामध्येही पद
सीमाय' यामध्येही षड्कायांचे वर्णन आहे, शत्रपरिक्षेमध्येही त्याचेच प्रतिपादन आहे. दसऱ्या अध्ययनामध्येसुद्धा त्याचे पुन्हा पुन्हा वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे ने सद्धा पुन्हा पुन्हा वर्णन आले आहे. प्रमाद-अप्रमादाचेही प्रतिपादन केलेले आहे. भागामध्ये आले आहे तेच उत्तराध्यनामध्येही आले आहे हा पुनरुक्तीचा दोष
माधचे लक्ष्य एकमात्र 'मोक्ष प्राप्त करणे' त्यानुसार प्रयत्न करणे हेच असावे. तेव्हा की योनीप्रभुतासारखे ज्योतिषविषयक शास्त्रवाचण्याची त्यांना काय आवश्यकता आहे ? से सांगणे सूत्राचा अवर्णवाद आहे. त्यांना समजत नाही की सूत्रामध्ये कायादिंचे जे
बार निरूपण केलेले आहे त्याचा अर्थ असा आहे की अत्यंत सूक्ष्मतेने प्रयत्नपूर्वक त्यांचे रक्षण केले पाहिजे. हेच धर्माचे रहस्य आहे, तत्वाबद्दल अत्यंत आदर दाखविणारे वचन आहे. हा पुनरुक्तीचा दोष नाही. तसेच ज्योतिषशास्त्रांदिचे ज्ञान, मुमुक्षूच्या प्रव्रज्या इत्यादी शुभकार्यांमध्ये उपयोग करण्याच्या दृष्टीने आहेत म्हणून परंपरेने ते मोक्षपर आहे.१३५ ।
२) सर्वज्ञ अथवा केवलीचा अवर्णवाद - अशी शंका घेणे की केवलीला झानोपयोग, दर्शनोपयोग क्रमाने होतो का ? जर क्रमाने होतो असे म्हटले तर ते ज्या काळाला जाणतात त्या काळाला पाहत नाहीत आणि ज्या काळाला पाहतात त्या काळाला जाणत नाहीत अशाप्रकारे एकांतरीत ज्ञान दर्शनाचा उत्पात झाला तर केवलज्ञान, केवलदर्शनाचा आवरक होईल. अशाप्रकारे शंकेला पुढे वाढवून सांगतात की जर दुसरा पक्ष असा मानला की केवलज्ञान आणि केवलदर्शन हे एकाचवेळी होतात तर असे म्हणणे योग्य होणार नाही कारण असे झाले तर साकार आणि अनाकार उपयोग दोन्ही एक होतील. केवलज्ञान, केवलदर्शनाचे स्वरूप जसे शास्त्रामध्ये दाखविले आहे तसे केवलज्ञानीमध्ये दिसत नाही. असे केवलीच्या अवर्णवादामध्ये म्हटले आहे. केवलीचा अवर्णवाद सांगणे हे आत्मपतनाचे कारण आहे. ह्यापासून वाचण्यासाठी अशा अशुभ भावना साधकाने मनात आणू नये.१३६
३) धर्माचार्यांचा अवर्णवाद - हे आचार्य विशुद्ध अथवा उच्च कुळातील नाहीत, र व्यवहार कुशल नाहीत, त्यांना उचित-अनुचित यांचे ज्ञान नसते, हे आपल्या गुरूंची सेवा सात नाहीत, अनुचित कार्य करतात, ईष्यापूर्वक गुरूंचे दोष पाहतात व ते लोकांना सांगतात, उसच्या प्रतिकूल आचरण करतात. असे करणे हे पापाचरणमूलक आहे. यापासून वाचणे आवश्यक आहे.१३७ ह्या सर्व गोष्टींचा 'धर्माचार्याच्या' अवर्णवादामध्ये समावेश होतो.
समिति