________________
(२५६)
या तत्त्वानुसार साधकाला प्रश्न पडतो की हसणे, चेष्टा करणे हे देखील अशुभ
आहे काय?
डोळ्यांनी हसतात, अर्थात फक्त डोळ्याने स्मित करतात.
"उत्तम ज्ञानी पुरुष मध्यम पुरुष हसताना ओठ हलवतात पण दोन मिनिटात हसने थांबवतात. अधम आणि खूप मोठ्याने हसतात. त्यांचे हा हा ही - हीचा आवाज पुष्कळ निकृष्ट प्रकृतीची माणसे वेळ चालू राहतो. कधी कधी भ्रम होतो की हे वेडे - बिडे तर झाले नाही ना ? काही अधम लोक दात वाजवत खळाळून हसतात. १३० अशा प्रकारचे हास्य असभ्यतेचे प्रतीक आहे. वास्तविक विवेकी माणसाने हसणे हसविणे यात विवेक ठेवावा. यात अविवेक असेल तर अशुभतेचे प्रतीक आहे.
भगवती आराधना मूळ नाव मूलाराधना यात कन्दर्प इ. भावनेचे विवेचन आहे. आ. शिवार्य यांना ह्या भावनांना संक्लेश उत्पन्न करणाऱ्या आहेत असे म्हटले आहे.
कांदर्पी भावनेचे निरूपण करताना एका श्लोकातच पाचही भावनांचा नामोल्लेख केला आहे. विजयोदय टीकेमध्ये ह्या भावनेचे वर्णन करताना लिहिले आहे की, रागाच्या भरात हास्यमिश्रित असभ्य वचन बोलणे कंदर्प वचन आहे. अती रागाने हसून दुसऱ्यांना उद्देश्यून शरीराचे असभ्य अभिनय करून असभ्य वचन उच्चारणे कौत्कुच्य होय. कंदर्प आणि कौत्कुच्य वचनाचा जो पुन्हा पुन्हा प्रयोग करतो त्याला चलशील अथवा द्रवशील समजावे. नेहमी हास्य उत्पन्न होईल अशी कथा सांगणारा, मंत्र, इन्द्रजाल इ. कौतुक दाखवून लोकांना आश्चर्यचकित करणारा, रागजनित हास्य, वचनयोग, कायायोग द्वारा लोकांना विस्मित करणारा त्याला कंदर्प भावना म्हणतात.
मूलाचारमध्ये वडकेराचार्य यांनी कांदर्प इ. अशुप भावनेचे वर्णन करताना लिहिले आहे की ह्या भावनेत असणारा हलक्या कोटीच्या देव गतीत उत्पन्न होतो. मृत्युसमयी जर असे तुच्छ विचार, भावना आल्यातर संयमाची विराधना झाल्यामुळे कान्दर्प, अभियोगी इत्यादी देवगती मिळते. कंदर्प भावनेचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात
जो साधक असत्य बोलतो, असत्याचाच प्रचार करतो तो कन्दर्प जातीच्या देवगतीत जातो. १३२
श्रावकाच्या बारा व्रतांमध्ये अनर्थदंड हे आठवे व्रत आहे. त्याचा पहिला अतिचार कंदर्प आहे. चारित्रमोहात्मक रागाच्या उदयाने हास्यमुक्त अशिष्टवचनाच्या प्रयोगाला इथे कन्दर्प म्हटले आहे.१३३ अष्टप्राभृतमध्ये पण कंदर्पादी अशुभ भावनेचा उल्लेख आहे. त्यात
१५