________________
(२५५)
भाष्यकाराने त्या प्रत्येकाचे वर्णन केलेले आहे.
१) कंदर्प - यासंबंधी ते असे सांगतात की, विपरीत मुख करून उच्च स्वराने हास करणे, कामसंबंधी कथा करणे, कामुकतेचा उपदेश देणे आणि प्रशंसा करणे हे सर्व कंदर्पामध्ये समाविष्ट आहे. १२६
कामुक
विषयाची
२) कौत्कुच्य भांडाप्रमाणे चेष्टा करणाऱ्याला कुंत्कुच म्हणतात. तसेच 'त्यांच्या कार्याला 'कौत्कुच्य' म्हणतात. तशी चेष्टा शरीर आणि वाणीद्वारे केली जाते. स्वतः न हसता गंभीर राहून नाक, भुवया नेत्र, मुख, दात, ओठ, हात, पाय, कान इत्यादी शरीराच्या अवयवांद्वारे अशी चेष्टा दाखविणे की दर्शक त्या पाहून हसून हसून बेजार होतात.
अशाप्रकारे शरीरकुचेष्टेला 'काया कौत्कुच्य' म्हणतात. 'बाक् कौत्कुच्या' मध्ये बाणीद्वारे अशा प्रकारे बोलले जाते की जे ऐकून दुसरे हसतील, आश्चर्य करतील. मोर, माजर, कोकीळ, कुत्रा इत्यादी पशुपक्षांचे आवाज काढणे, मुखाने वाद्यांचा आवाज काढणे, मुखाने वाद्यांचा आवाज काढणे हे सर्व 'कौत्कुच्य' भावनेच्या अंतर्गत येते. १२७
३) द्रवशीलता 'द्रव' याचा अर्थ 'द्रुतता' आहे. जो शरदऋतूमध्ये दर्पित बैलाप्रमाणे द्रुतगतीने चालतो. तो द्रुतकारी आहे. येथे बैलाची उपमा देण्याचे कारण हे आहे की शरदऋतूमध्ये बैलाला खाण्यासाठी खूप चारा मिळतो. आणि माशा, मच्छर इत्यादींचा उपद्रव राहत नाही म्हणून बैल मदोन्मत्त होऊन उच्छृंखलपणे फिरतो.
-
द्रवशील पुरुषसुद्धा तशाच प्रकारे निरंकुश होऊन द्रुतगतीने चालतो. नीट पाहिल्याशिवाय सर्व क्रिया वेड्याप्रमाणे करीत राहतो. अशा बाधक स्थितीची भावना ठेवल्याने साधकात्मा स्थिरतेच्या दिशेमध्ये अग्रेसर होतो. १२८
४) हासकारिता - बहुरूपीप्रमाणे नानाप्रकारचे वेश आणि रूप घेऊन, विविध प्रकारची बचने बोलून दुसऱ्यांच्या बोलण्याची नक्कल करून हसविणे, याचा हास्यकारितेमध्ये समावेश होतो. असे केल्याने मनाचे स्थैर्य नष्ट होते. त्याचे स्थान तुच्छता घेते. अशाप्रकारे हास्यकारितेच्या दुष्परिणामाचे चिंतन, अनुभावन केल्याने या वृत्तीपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते.
५) परविस्मायकता - इंद्रजाल, जादूचे खेळ आणि असेच अन्य कौतुक तमाशे करून कोडे, वक्रोक्ती इत्यादी सांगून ग्राम्य लोकामध्ये प्रचलित आलाप - संलापाने दुसऱ्यांना विस्मित करणे, चित्तभ्रम निर्माण करणे म्हणजे परविस्मायकता किंवा परविस्मापन आहे. १२९