________________
(२४५)
ही आचार हा विचारपूर्वक नसतो. मायेचे हे असे भयंकर दुष्परिणाम आहेत म्हणून
मायाचार कधीच करू नये.१०१
माया केल्याने स्त्रीवेद प्राप्त होतो.१०२ "मायी विउव्वइ नो अमायी विउव्वइ'' (भगवती सूत्र १३/९)
ज्याच्या अंतःकरणात माया आहे तोच अनेकविध रूपाने ती व्यक्त करतो. ज्याचा आत्मा सरळ आहे तो मायाचाराचे प्रदर्शन कधीच करीत नाही.१०३
"सच्चाण सहस्साण वि, माया एक्कवि णासेदि" आचार्य शिवार्य लिहितात - "एक माया हजारो सत्यतेचा नाश करून
टाकते. १०४
म्हणून ज्यांना आपले आत्मकल्याण साधण्याची इच्छा आहे, त्यांनी माया, कपटाऐवजी सरळता, निष्कपटतापूर्ण वर्तन करायला पाहिजे. त्याच्या हृदयातच धर्म टिकतो. म्हणून नेहमी आंतरवाह्य समानता ठेवली पाहिजे. आपली आंतरिक व बाह्य प्रवृत्ती शुद्ध ठेवतो अशा व्यक्तीने थोडी क्रिया केली तरी ती शुद्ध असल्यामुळे लवकर मोक्षापर्यंत . पोहोचतो.
लोभानुबंधी भावना पदार्थांची तीव्र इच्छा व पदार्थाबद्दल तीव्र ममता आणि तृष्णारूप आत्मपरिणाम म्हणजे लोभ. चार कषायांपैकी सर्वात प्रबळ आणि सूक्ष्म कषाय म्हणजे लोभ. लोभ सर्व अन्य चांगल्या गुणांचा नाश करतो. स्थूल लोभापेक्षा सूक्ष्म लोभाचा त्याग फार अवघड आहे. मोठमोठे योगी, साधक व्यक्तीसुद्धा आपल्या यश, प्रतिष्ठेच्या लोभाला सोडू शकत नाहीत. मंदीर, मठ, आश्रम, पंथ इत्यादीचा मोह असतो. प्रतिष्ठा मिळवण्याची भूक असते. लोभामुळे पदार्थाबद्दलची आसक्ती सुटू शकत नाही. असे अनेक सूक्ष्म लोभ आहेत ज्याने माणूस जखडलेला आहे. हे सत्य आहे की माणूस एकटा आला की एकटाच जाणार आहे, तरी आसक्ती सुटत नाही. वस्तूंचे आकर्षण, विदेशी बँकेत पैसा जमा करणे, हा लोभाचाच प्रकार आहे. लाच घेणे, एन केन प्रकारेण धन प्राप्त करण्याची आसक्ती माणसाला लोभामुळेच प्राप्त होते. संतोषात सुख आहे हे भलभल्यांच्या लक्षातच येत नाही. इन्द्रियासक्ती ही लोभाची परिसीमा आहे. लोभ सर्व पापांचा
बाप आहे. क्रोधमान, मायाप्रमाणे ठाणांग सूत्रात लोभसुद्धा चार प्रकारचा सांगितला आहे.१०५