________________
(२४६)
अनंतानुबंधी लोभ - म्हणजे अती गाढतम लोभ रेशमाच्या गाठीसारखा - सुटत नाही. लोभी माणसाची तृष्णा कधीच पूर्ण होत नाही.
२) अप्रत्याख्यानी लोभ - गाढतर लोभ चिखलाच्या रंगासारखा लवकर जात
३) प्रत्याख्यांनी लोभ - गाढ लोभ खंजनच्या रंगासारखा अल्पकाळ राहणार
असतो.
संज्वलन लोभ - अगदी क्षणिक लोभ.
EATRE
R
लोभामुळे माणूस अवगुणांचा संचय करतो. लोभी माणूस आप्तेष्टांची उपेक्षा करतो. आणि स्वतःच्या शरीरालाही खूप कष्ट देतो.
वस्तू कर्मबंधनाचे कारण नाही. वस्तूबद्दलची जी आसक्ती ती कर्मबंधनाचे कारण आहे. तृणमात्राचा जरी लोभ केला तरी पापबंध होतो. मन जर निर्लोभी असेल तर अनेक प्रकारच्या सुखसाधन व संपत्ती जरी मिळाली तरी कर्मबंध होत नाहीत.
लोभ हा असा हव्यास आहे की तीन लोकांची संपत्ती जरी मिळाली तरी लोभ आवरत नाही. संपुष्टता प्राप्त होत नाही. समाधानी व संतोषी वृत्ती असेल तरच पापबंधापासून मुक्त राहता येते.
एक लोभ आला की त्याच्या पाठोपाठ हिंसा, असत्य चोरी इ. अवगुणांचा तांडामागे येतो.
शत्रू, अग्नी, हिंस्त्र पशू, विषधारी सर्प हे जेवढे नुकसान करीत नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक हे चार कषायरूप शत्रू आपला सर्वनाश करतात. लोभ हा असा कषाय आहे जो मोक्ष प्राप्तीमध्ये मोठे विघ्न उपस्थित करतो.१०६
ममाई लुप्पइ बाले १०७ लोभ ममत्वामुळे उत्पन्न होतो. त्यामुळे अज्ञानी जीव ससारात भटकतात. लोभी माणसाला आपण सहज ओळखू शकतो. लोभी फक्त संग्रहच करीत राहतो. लालच अशी भावना आहे त्यामुळे विवेक रहात नाही. काय करावे, काय करू नये, कसे वागावे याच भान त्याला रहात नाही. धन कमवितांना लोकांनी अपमान कला तरी त्याला त्याचे काही वाटत नाही. द्रोपदीच्या वस्त्राप्रमाणे लोभाचा अंत होत
29-
लाल
नाही.
जोपर्यंत माणूस तृष्णने ग्रस्त आहे तोपर्यंत तो भौतिक सुखसाधनसंपन्न असूनही
दरिद्री आहे.