________________
(२४४)
र बोलतो पण हृदयात दुष्ट भावना ठेवतो.
सिंह, वाघ, विंचू इ. विषारी किंवा हिंस्त्र पशुंचा सहवास बरा पण मुमुक्षू जीवाने यावी दष्ट मनुष्याचा समागम टाळावा कारण तो घातक आहे.
मायावी मनुष्य अधम मानला जातो. त्याचे व्रत, उपवास, जप, तप स्वाध्याय, और दान, पूजा, ध्यान, तीर्थयात्रा, क्रिया, विद्या, बुद्धी, मानवजन्मरूपी धन धारावाहिक बोलण्याची शक्ती आणि आपला आत्मा सर्व काही व्यर्थ आहे.
हा जीव माया करून तीव्र पाप उत्पन्न करतो. त्या पापामुळे अत्यंत भयानक अशा नरक निगोदात जाऊन पडतो आणि भयंकर पारतंत्र्यात पडून क्षेत्रसंबंधी महादुःख सहन करतो. बध बंधनाच्या असह्य दु:खाला भोगतो. नरकयातना भोगतो.
तिर्यंच गतीत गेला तर अत्यंत तीव्र दुःख सहन करतो. तिथे शारीरिक भयंकर त्रास सहन करावा लागतो.
मायाचारी माणसाला मनुष्य गतीमध्ये जन्म मिळाला तरी त्याला वध, बंधन इ.चे दुःख सहन करावे लागते. पुत्र कुपुत्र निपजतो, पत्नी कुटुंबातील लोक इ. दुःख देतात.
अनिष्ट संयोगाने दुःखी होतो. अपमान होतो. धन इ. न मिळाल्याने दुःखी होतो. धनाचा नाश होतो. दरिद्री अवस्था होते असे अनेक परिणाम होतात व फक्त दुःखच वाट्याला येते.
मायावी माणूस जर देवलोकात गेलाच तर तेथेही इन्द्र इ. देवांची ऋद्धी-सिद्धी पाहून, त्यांचे रूप-सौंदर्य पाहून सतत मनात कुढत राहतो, संतप्त राहतो, दुःखी राहतो.
मायावी माणूस अत्यंत दुर्भागी होतो. मूर्ख होतो. मनोवांछित फळ देणाऱ्या धर्मापासून विमुख राहतो. धर्माचा त्याग करतो. सुखशांती त्याला मिळतच नाही. स्वतःची आत्मशुद्धी होणे शक्यच नाही, इतरांची शांतही नष्ट करण्याला कारणीभूत ठरतो.
कषायरूपी अग्नी सतत भडकलेलीच असते. कलह, वैर यांची वृद्धी करतो. अधर्म व असत्य मार्ग अनुसरतो. दया, क्षमा, शांती इ. आत्मिक गुणांचा त्याग करतो. अशाप्रकारे अनेक दृष्टीने जीवन असह्य वेदनेने भरलेले राहते.
मायावीची प्रत्येक कृती ही अशुभ मायानुबंधीची भावना काम करते. त्याचा