________________
(२४३)
मीठाच्या भांड्यात दूध नासते. साधकाला जर आपल्या हृदयात अध्यात्म्याची ज्योत प्रज्वलित करायची असेल तर कपटाचाराची वक्रता सोडावी लागेल. आत्म्यात आता तर तो शुद्ध होइल. मग साधक जी काही क्रिया करेल त्याचा परिणाम येईल.
सरळता
शुभ
आज बाह्यरूपावरून साधक दिसला वेश बदलता म्हणजे कोणी साधू बनू शकत नाही खरी साधुता मनातले कषाय विकार रहित करण्यात आहे. ९९
गृहस्थाश्रमात सुद्धा या मायेच्या जाळ्यात अडकणारे आहेतच. कथनी आणि करणीत साम्य नाही. पाप झाकण्यासाठी धार्मिक क्रिया करतात, त्यांना भवताची उपमा मिळू शकते पण ईश्वर नाही. सगळेच असे असतात असे नाही. 'बहुरत्ना बसुन्धरा' पण आहेत. कित्येक खरोखर खऱ्या अंतःकरणाने कठोर व्रत करतात, तपस्येत मग्न असतात. आत्म्यात सरळता असते. सर्व भौतिक सुख मिळून सुद्धा 'जलकमलवत्' निर्लिप्त असतात. तो साधक मुक्तीचा अधिकारी असतो.
बाह्य क्रियेपेक्षा आंतरिक शुद्ध क्रियेचे मूल्य अंसख्य पटीने जास्त आहे. शारीरिक सौंदर्य नसले तरी अंतःकरण सुन्दर असेल तर तो महान साधक होय. सोन्याचे पात्र मदिरेने भरले असेल तर त्याचा काय उपयोग ! पण जर मातीच्या पात्रात अमृत असेल तर ते उपयोगी आहे. कारण तो अमरत्व प्रदान करतो.
कपटी व्यक्ती आध्यात्मिक दृष्टीने तर ठगली जातेच पण भौतिक सुखापासून दुरावते. मायेची चाल वक्रगतीने चालणाऱ्या नागिणीसारखी असते. मायावी कुणाच्याही भाग्याला हरण करू शकत नाही. आणि आपले दुर्भाग्य मिटवू शकत नाही. मायाचरणाने कर्मबंध करतो. १००
एखादी व्यक्ती नग्नावस्थेत राहून अनेक प्रकारचे व्रतवैकल्य करते. शरीर क्षीण करतो पण हृदयात जर दंभ (माया) असेल तर अनन्तकाळापर्यंत जन्ममरणाच्या चक्रातून बाहेर येत नाही. त्या चक्रात भरकटत राहतो.
मायावी मन, वचन कायेने वक्र असतो. धर्मसाधनेतही कपटीपणा करतो. त्याची विचारशक्ती वक्र, बुद्धी वक्र आणि आचार ही बक्र असते. ज्याप्रमाणे शिकारी कपट करून सावज पडकतो, मांजर उंदराला पकडण्यासाठी ध्यान लावून बसते, बगळा मासे पकडण्यासाठी ध्यानस्य बसतो, गिधाड मांस खाण्यासाठी ध्यानमझ होतो, त्याचप्रमाणे मायावी पापी मनुष्य आपले कार्य सिद्ध करण्यासाठी, लोकांना फसवण्यासाठी तोंडाने गोड