________________
(२४२)
रुण मनात करावी लागते. योजनाबद्ध कार्यक्रम आखावा लागतो. कपटाची चिंता सुरू हो पतनाची प्रथम पायरी चिन्ता चिंता हा रोग आहे. कपट म्हटले की असत्य व असत्यकाम करण्यात भीती आलीच. हे त्रिकूट माणसाच्यातील माणूसकीचा घात करून टाकतो. त्याला सारखी भीती वाटत असते. माझे कारस्थान उघडकीला आलेतर !
ही चिंता त्याला सतत बोचत असते. म्हणजे मन अशांत राहते. सतत भयग्रस्त राहते. भय मनाला खात राहते. कपटीपणा केल्यानंतरही मनात बोच राहते. अंतरचेतना धिक्कारत असते.
कपटी मनुष्याला शांती नसते. स्वस्थ झोपही येत नाही. त्याचे संतुलन बिघडते. कपटीपणाचा परिणाम भोगावाच लागतो. चेहऱ्यावर त्याचे कुटील भाव स्पष्ट दिसतात. छोटे कधी ना कधी उघडकीस येतच,
कपट ही रौद्रध्यानाची अवस्था आहे. कपट करणारा स्वतः धोका खातोच पण कुटुम्ब समाज, राष्ट्र, देशाचेही अहित करतो.
माया संसारवृद्धी करणारी आहे. इहलोकात अप्रिती उत्पन्न करणारी आहे. अनेक पापाला जन्म देणारी आहे. ९६
माया तीक्ष्ण धारदार तलवार आहे. जी मित्रत्वाचा क्षणात नाश करते. ९७ कपटी मनुष्य क्षणमात्र सुखी आहे असे भासते पण खरे सुख त्याला मिळतच नाही. माया टोकदार काटा आहे, जो अंतकाळापर्यंत आत्म्याला टोचत राहतो. माया विकासमार्गावरील अवरोध निर्माण करणारी आहे.
तीव्र मान मनुष्याला मिथ्यादृष्टीयुक्त बनवतो. कपटी मनुष्य आपले कार्य जरी खूप सावधपणे करीत असता तरी त्याचे भयंकर परिणाम त्याला केव्हाना केव्हा भोगावेच लागतात. कपटी माणूस मोठा ताघवी असतो. वाणीत माधुर्य असते. पण अंतःकरणात पापीवृत्ती असते.
'कपट' वरून दिसत नाही, पण त्याला ओळखता येते, वरून तो सज्जन भासतो. पण माया करणारा तिर्यंच योनीत जातो. कारण तिर्यंच तिरका चालतो. सरळ दांड्यावर ध्वज फडकू शकतो. त्याचप्रमाणे सरळ आत्म्यातच सम्यक्त्व राहू शकते. बक्र हृदयाला माया म्हणतात. अशा हृदयात धर्माचे बीज रुजू शकत नाही. शुद्ध आत्म्यात धर्म स्थिर राहू शकते ९८