________________
(२१४)
करण्यासाठी मिळालेले
वरील विश्लेषणाचा सारांश हाच आहे की, शरीर, इन्द्रिये, धनवैभव, विचार
मिळालेले मन ही आपली संपत्ती आहे. ह्यांचा योग्य प्रकारे उपयोग केला करती चोरी आहे. मिळालेल्या अमूल्य संपत्तीचा योग्य प्रकारे विनियोग करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.
ह्या संपत्तीचा उपयोग आपले जीवन उन्नत, मंगलमय आणि पवित्र करण्यासाठी केला पाहिजे.
आपल्या जवळ ज्ञानाचा खजिना आहे. आपण ते ज्ञान शास्त्र, आचार्य संत, लेखक यांच्या कडून ते मिळवले. पण ते ज्ञान आपण स्वतः निर्माण केलेले नाही. कुणाकडून तरी ते घेतले आहे. ज्यांच्याकडून आपण ते घेतले त्यांचे आपल्यावर फार उपकार आहेत. त्या उपकाराच्या त्ररणातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे. तो म्हणजे आपल्याकडे जे ज्ञान मिळाले आहे ते योग्य लोकांना द्यावे. ज्ञान मिळवण्यासाठी कोणी जिज्ञासू आला तर त्याला ते द्यावे. त्यात आपले सौभाग्य मानावे. तसे जर करू शकलो नाही तर ही ज्ञानाची चोरी होईल व ज्ञानावरणीय कर्माचे बंध होतील.
आपल्या जीवनात माणसाने खूप धन मिळविले तसेच एखाद्याने खूप ज्ञान मिळविले पण त्याचा उपयोग इतरांसाठी केला नाही तर पुढच्या जन्मात त्या वस्तूंचा अभाव होतो. धन खूप असले ते जर गरजवंतांना दिले नाही, दान केले नाही तर पुढच्या जन्मी दारिद्रय पदरी पडते. तसेच ज्ञान असून जिज्ञासू व्यक्तीस ते दिले नाही तर पुढच्या जन्मी मंदबुद्धी जन्म मिळतो. ज्याप्रमाणे आपल्याला दोन हात आहेत. त्यापैकी एक हात महिनाभर अजिबात हलवाच नाहीतर तो उचलण्याचा प्रयत्न केला तर तो उचलताच येणार नाही. त्याचा उपयोग करता येत नाही. तसेच आपल्याकडे जी शक्ती आहे, तिचा उपयोग केला नाही तर योग्य वेळी ती सक्रिय होणार नाही. ती नष्ट होऊन जाईल. पुढच्या जन्मी सुद्धा परत मिळणार नाही. हे सत्य सतत लक्षात ठेवून आपले कर्तव्य करीत राहिले पाहिजे.
जो आपल्या जीवनात अस्तेय येऊ देत नाही. त्याच्या जीवनात अहिंसा आणि सत्य तत्व येतातच. अस्तेय असेल तर हिंसा आणि असत्याची भावना आपोआप शिथिल होत जाते. स्तेयाचे पाच अतिचार आहेत.४०
१) स्तेन प्रयोग - चोराला चोरी करण्याचा उपाय सांगणे. चोरी करण्याची प्ररणा देणे, किंवा दुसऱ्याकडून प्रेरित करणे किंवा चोरीच्या कामात संमती देणे.