________________
(२१३)
मग अन्न कबुतरांना-पक्ष्यांना
तराना-पक्ष्यांना टाकले जात आहे आणि असे समजले जात आहे की आम्ही हि आहोत व दुसरीकडे त्याचवेळी हजारो, लाखो माणसे उपाशी आहेत. अशा वेळी
अधिकारांचे अपहरण आहे असेच म्हणावे लागेल. जो अन्नावरच जगतो त्याला अल न देता गवतादी खाणाऱ्याला ते अन्न देणे अयोग्य आहे. जेव्हा देशात अन्नाची
मोती व ते अन्न जर मनुष्यांना देऊन उरले तर ते पक्षांना, प्राण्यांना दिले जात होते. ही प्रथा योग्य होती.
'दान देणे' अयोग्य आहे असे नाही. परंतु ते क्रमवार देण्याची परंपरा आहे. हा विसरल्यावर अनर्थ घडतो. बिहार आसाम, बंगालचे लोक अन्नाअभावी आपल्या मुली, मनांना विकतात हे ऐकल्यावर सृष्टीमध्ये किती पाप वाढू लागले आहे याची कल्पना येते. अशा परिस्थितीत मनुष्याचे हे कर्तव्य आहे की प्रथम मनुष्यांबद्दल दया, प्रेम यांचा स्रोत वाहू द्यावा.
त्यानंतर अन्य चराचर प्राण्यांसाठी त्याचा उपयोग करावा. हा खरा स्वाभाविक क्रम आहे. ह्या क्रमाचा व्यतिक्रम करणे म्हणजे भगवत् आज्ञेची चोरी करण्यासारखे आहे. अशा प्रकारची चोरी माणसाने करू नये. आपला विवेक जागृत ठेवूनच दान करावे व आपल्या कर्तव्याचे पालन करावे. ३९
जी व्यक्ती ज्या पदावर आहे, तेथील काम प्रामाणिकपणे करीत नसेल तर ती ही चोरी आहे. उदा राजसिंहासनावर अधिष्ठित राजा आपल्या प्रजेचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करीत नसेल, प्रजेच्या कल्याणासाठी झटत नसेल तर तो राजा आपल्या कर्तव्यापासून च्यूत झाला असेच म्हणावे लागेल. ही सुद्धा चोरीच आहे.
आज जगात कोणी कामचोर, कुणी कर्तव्य चोर, कुणी शक्तीचोर आहे तर कुणी ज्ञान आणि दर्शनाची चोरी करीत आहेत.
तात्पर्य हे की ज्या वस्तू आपल्याला मिळाल्या आहेत, जी तत्त्वे आपल्याला प्राप्त झालेली आहेत, त्या महत्त्वपूर्ण वस्तूंचा आपण योग्य प्रकारे उपयोग केला नाही तर ती चोरी आहे.
___ आपल्याला विचार करण्यासाठी मन मिळाले आहे पण मनात शुभ विचार न करता, सतत वाईट विचारात मनाला गुंतवले, अशुभ विचारांचा मनात संग्रह केला तर ही मानसिक चोरी आहे.
पाच इंद्रियांचा योग्य उपयोग न करता दुरुपयोग करणे पण चोरी आहे.