________________
(२१२)
लेक असे नामधारी सावकार आहेत, जे बाह्यतः धर्मात्मा दिसतात. परंतु
कार मिळताच गोड गोड बोलून फसवितात. फसविण्याचे कार्य इतक्या केलेले असते की त्यातील लबाडी कोणाच्याही लक्षात येत नाही. बोलात, मोलात, तोलात, मापात, छापात फसवून जमेल तितके लुटण्याचा प्रयत्न ग्राहकाला विश्वासात घेण्यासाठी आईची, गाईची, मुलांची शपथा खातात. चांगला दाखवन खराब माल देतात. भेळमिसळ करतात. अशाप्रकारे अनेक चोरीची कामे
सावकार म्हणवतात आणि आपल्या लबाडीला बुद्धिमत्ता समजून खूप आनंदीत होतात. ह्या सर्व स्तेयानुबंधी भावना आहेत.३६
दसऱ्याचे द्रव्य हडपण्यामध्ये ज्यांची बुद्धी आसक्त झालेली आहे असे चोर सर्वासाठी उद्वेग, उपद्रव करणारे ठरतात. सर्वांनाच त्याची भीती वाटते. त्यांच्यापासून सावधान राहतात. चोराला राजा इ. कडून क्लेश होत असतो. मार खावा लागतो, कधी फाशीची शिक्षा सुद्धा भोगावी लागते, कधी बेड्यांच्या बंधनाने बांधले जाते, कान, नाक इ. अंगांचे छेदन केले जाते, कधी त्याचे घर, जमीन, संपत्ती इ. जप्त केले जातात आणि ह्या दुष्कृत्याने संचित पापकर्माचा उदय झाला तर परलोकात विविध दुर्गतीत भ्रमण करावे लागते आणि ह्या लोकात व परलोकात निंदेचे पात्र व्हावे लागते. म्हणून चोरी न करणेच कल्याणकारी आहे.३७
चोरी न करता मिळविलेला एक पैसा सुद्धा रुपयाच्या बरोबरीला असतो. तसेच जर हजारो, लाखो, करोडो रुपये जर गरीब लोकांच्या अधूंनी, शापाने म्हणजे त्यांचा शाप घेऊन मिळविलेले असतील तर ते विनाश करतील, सत्यानाश करतील. कोणाच्याही अधिकाराची वस्तू घेणे चोरी आहे.
एक व्यक्ती जर एखाद्या पदाचा अधिकारी आहे व तो त्या पदासाठी योग्यही आहे. परंतु ते पद त्याला न देता जर दुसऱ्या व्यक्तीला दिले, ती व्यक्ती त्या पदासाठी योग्य नसतानाही त्याला ते पद दिले गेले तर शासकवर्गाच्या ह्या कामाला सुद्धा चोरीच म्हणावी लागेल. ही अधिकाराची चोरीच आहे.
केवळ देणे म्हणजे दान नाही. देण्याच्या मागे विवेक आणि सदबुद्धीसुद्धा असणे आवश्यक आहे. 'दान देणे' यास चोरी म्हणणे जरा अयोग्यच वाटते. परंतु अधिकाराचे अपहरण करणे, अधिकाराची वस्तू न देणे ह्याला आध्यात्मिक भाषेत चोरी म्हणतात.३८
आपल्या कर्तव्याचे पालन न करणे ही सुद्धा चोरीच आहे. एकीकडे जर हजारो