________________
जीवनात जितकी सरळता तितकी ज्ञानाची निर्मळता आणि ज्ञानाची निर्मळता जितकी जास्त तितके आत्मकल्याण जास्त होते. प्रस्तुत प्रकरणात अशुभ वृत्तीच्या नाशासाठी शुभ प्रवृत्तीची आवश्यकता आणि शुभ प्रवृत्तीमुळे शुद्धोपयोग किंवा शुद्ध भावनेच्या विकासाचा अभ्यास क्रमाक्रमाने कसा केला जातो त्याचे विवेचन केले गेले आहे. प्रकरण ८ : 'उपसंहार'
प्रस्तुत शोधप्रबंधात भावनेच्या संदर्भात केलेल्या समीक्षात्मक विवेचनाचा ह्या प्रकरणात उपसंहार केला आहे. 'उप' म्हणजे समीप, जवळ आणि 'संहार' म्हणजे नाश करणे विध्वंस करणे. अर्थात मुमुक्षू जीवाच्या दोषांचे अत्यंत निकटतेने संपूर्णपणे ४ छेदन करणारा उपसंहार आहे. भावनायोग ग्रंथरूपी प्रासादाचे निर्माण झाल्यावर ह्या दिव्य प्रासादाच्या शिखरावर उपसंहाररूपी कळस ह्या प्रकरणात चढवला जाईल.
__ ही आठ प्रकरणे आठ कर्म नष्ट करण्यासाठी सहाय्यभूत व्हावीत अशी भावना आहे. ह्या भावनेचे चिंतन, मनन प्रत्येक मुमुक्षू आत्म्यासाठी कल्याणकारी, आध्यात्मरसाच्या रसिकासाठी आनंदरसाने सराबोर करणारे, आंतरिक तृप्ती देणारे असावे हीच अभिलाषा !
प्रबंध लेखनाचा उद्देश मुमुक्षू साधकांना आणि जैन दर्शनानुसार उपासना करणाऱ्या साधकांना एक बौद्धिक पातळीवर साधन उपलब्ध करून देणे हा आहे. भावना या निराकार संकल्पनेला साकार करण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. जो परीक्षकाला सम्मत होईल असा विश्वास आहे.
कृतज्ञता अभिव्यक्ति -
प्रस्तुत शोधग्रंथाच्या लेखन कार्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात अनेक पूज्यनीय, वंदनीय, स्मरनीय गुरुवर्यांचे आशीर्वाद कृपादृष्टी आणि सत्प्रेरणा आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे.
___ माझ्या प्रगुरुवर्य अध्यात्म जगाची दिव्य ज्योती अमृतमय वाणीद्वारा जनतेसाठी धर्मसुधेची वृष्टी करणाऱ्या, पवित्र हृदयाविश्वसंत स्वरूपा, स्वर्गीय महासतीजी श्री उज्ज्वलकुमारीजी ज्या संपूर्ण साध्वी समुदायसाठी, नेहमी प्रेरणेची दिव्य स्रोतस्वीनी