________________
(११)
होत्या. त्यांचा स्रोत परंपरेने माझ्या शैक्षणिक, साहित्यिक आणि ह्या शोधकार्यात परोक्षरूपाने स्फूर्तीदायक बनला आहे. अशा महान प्रभाविका पवित्रात्म्यांच्या प्रती मी शतशत श्रद्धाविनता आणि कृतज्ञ आहे.
डॉ.
माझ्या आराध्य गुरुवर्या अध्यात्मयोगी, प्रवचन प्रभाविका विश्वशांतीरतन पू. धर्मशीलाजी महासतीजी ज्यांच्या आध्यात्मिक छत्रछायेत आणि सत्सान्निध्यात मी आपल्या विद्या, संयम, आणि साधनामय जीवनात नित्य प्रेरणा आणि मार्गदर्शन प्राप्त करीत आहे, त्यांचेपण मी आभार व्यक्त करते.
माझ्या ह्या शोधयात्रेच्या शुभकार्यात सद्भावना ठेवणाऱ्या पू. चारित्रशीलाजी म. विवेकशीलाजी म. आणि भक्तिशीलाजींच्या प्रती मी आपला आभार व्यक्त करीत आहे.
ह्या शोधकार्याच्या महप्रयत्नात विविध समस्यांचे समाधान करून कुशलतेपूर्वक मार्गदर्शन करणारे संस्कृत, प्राकृत, पाली इत्यादी प्राच्य भाषांचे ज्ञानी आणि भारतीय दर्शनाच्या विविध पक्षाचे मनिषी, प्राकृत शोधसंपन्न वैशाली आणि मद्रास विश्वविद्यालयाचे पूर्व प्राध्यापक डॉ. छगनलालजी शास्त्रीद्वारा अविस्मरणीय मार्गदर्शन प्राप्त झाले, मी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते. त्याचे शिष्य रिसर्च स्कॉलर धर्मबंधू श्री महेन्द्रकुमार रांकावत यांनी दिलेल्या सहयोगाबद्दल त्यांना साधुवाद देते.
जैन विद्या अनुसंधान प्रतिष्ठान मद्रासचे प्रेसिडेंट आणि अहिंसा रिसर्च फाऊडेशनचे निर्देशक, तत्त्वनिष्ठ, उदारहृदयी, प्रबुद्ध समाजसेवी, पितृतुल्य श्रावकवर्यश्री. सुरेन्द्रभाई एम. मेहता यांची विद्या विनियोगाची अभिरुची व संतसेवेची पुनित भावना श्लाघनीय आहे. त्यांच्या अपूर्व सहकार्याच्या प्रती धन्यवाद देत आहे.
घाटकोपरचे प्राध्यापक डॉ. रसिकभाई शाह यांच्या सहयोगाबद्दल त्यांचे पण आभार व्यक्त करते.
मुंबईतील घाटकोपर संघ आणि सोलापूर, पुणे, चेन्नईच्या श्रमणोपासक आणि श्रमणोपासिकांच्या प्रती मी आभार व्यक्त करते ज्यांनी सहृदयता आणि भक्तिभावनेने अध्ययनविषयी अपेक्षित सामग्री मिळवून देण्यात सहयोग दिला.
पुण्याचे श्री. महेश भोगीलाल दोशी तसेच श्री. दीपक मेहता यांनी प्रबंध पूर्ण होईपर्यंत सतत सहाय्य केले.