________________
(१८९)
अकल्याणकारी अशुभभावनेचे विवेचन मात कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात शुभ आणि अशुभ अशा दोन प्रकारच्या भाग दिसून येतात. ज्यांच्यामध्ये पापी प्रवृत्तीचा उदय होतो, ज्यांचे अंतःकरण
काराने व्याप्त असते. त्यांचे चिंतन, भाव, कर्म, अशुभकोटींचे असतात. एखाद्या और चांगल्या वातावरणात शुभात्मक प्रवृत्ती सुद्धा निर्माण होते. परंतु अधिकांशतः अशा व्यक्तीच्या जीवनामध्ये अशुभचे प्राधान्य असते.
साधनापथावर समुद्यत साधकाने सर्वप्रथम अशुभाचा परित्याग करणे आवश्यक आहे. त्यामुळे पापानवाचा अवरोध होतो आणि जीवात्मा शुभात्मक गतीमध्ये प्रवृत्त राहू
शकतो.
शुभात्मक प्रवृत्तीमध्ये राहणे वास्तविक साधनेचे परमोत्कृष्ट रूप नाही. परमोत्कर्षाला प्राप्त करण्यासाठी साहाय्य अवश्यक होते. साधनेच्या क्रमिक उत्कर्षासाठी शुभचे स्थान शुद्धत्व ग्रहण करतो. परंतु प्रारंभी साधकाला अशुभाचे परिवर्जन आणि शुभाचे परिग्रहण करणे आवश्यक आहे.
- जर आपण सूक्ष्मदृष्टीने पाहिले तर बारा भावनांचा मुख्य अभिप्राय अशुभ त्याग आणि शुभावस्थेला ओलांडून सिद्ध अथवा शुद्धावस्था प्राप्त करणे हा आहे. ह्या मतितार्थाला घेऊनच संवर व निर्जरा भावनेचे वर्णन केलेले आहे.
भावनायोगाच्या आराधनेमध्ये साधकाने अशुभविचार किंवा अशुभ चिंतनापासून दूर राहणे आवश्यक आहे. अशभ भावनेचा त्याग केल्याशिवाय अनित्य, अशरण भावनेत अविचलता येत नाही, हे लक्षात घेऊनच प्रथम अशुभभावनेचे विवेचन केले आहे. कारण संसारात हेय, ज्ञेय आणि उपादेय असे तीन प्रकारचे पदार्थ असतात. ज्याने आत्म्याचे अकल्याण, अहित होते ते हेय होय. म्हणून हे त्याग करण्यास योग्य आहे. ज्याने आत्म्याचे कल्याण सिद्ध होते ते उपादेय हेय आणि उपादेय हे सर्व पदार्थ ज्ञेय अर्थात जाणण्यायोग्य आहे. कोणत्याही विषयाकडे अथवा पदार्थाकडे जर आपण तटस्थतेने अथवा उपेक्षेने पाहिले तर त्यात काही दोष लागत नाही आसक्ती ठेवल्याने दोष लागतो.
विद्वानांचे असे अभिमत आहे की पाप इत्यादी हेय वस्तूला सुद्धा जाणणे आवश्यक आहे. त्याच्या त्यागाचे भाव आल्यावर अकरणीय, दूषित कार्यापासून आपण आपल्याला अलिप्त ठेवू शकतो. जेव्हा मनुष्य पापी प्रवृत्तीहून वेगळा राहतो तेव्हा त्याच्या वृत्तीमध्ये शुभत्वाचा संचार होतो. ह्याच वैचारिक पक्षाला लक्षात ठेवून प्रथम अशुभ