________________
(१८८)
सिकलाल शेठ - गुजराती जैन समाजाच्या गृहस्थ लेखकांमध्ये 'रसिकलाल
अत्यंत प्रसिद्ध आहे. व्यावसायिक जीवनामध्ये व्यस्त असूनही धार्मिक तन मननामध्ये ते भाग घेतात. धर्मासंबंधी अनेक लोकोपयोगी विषयावर यांनी
कोठ' हे नाव अत्यंत प्रसिद्ध
अनेक पुस्तके लिहिलेली आहेत.
गांनी 'भावना भव नशिनी' या पुस्तकाचे लेखन केले त्यात अनित्यादी बारा गि मैत्री इत्यादी चार भावनांचे उदाहरणासहित विश्लेषण केले आहे.
प्रवर्तक उमेशमुनी - श्री उमेशमुनी महाराज स्थानकवासी जैन श्रमण संघाचे कोटीचे संत आहेत. ते मालव प्रदेशाचे प्रवर्तक आहेत. संस्कृत, प्राकृत इ. उच्च या आणि जैन दर्शनाचे मर्मज्ञ मनिषी आहे, त्यागी वैरागी आणि क्रियानिष्ट साधक आहेत. जैन धर्माच्या प्रसारासाठी भारतातील निरनिराळ्या ठिकाणी पादविहार करतात. हे अनेक पुस्तकाचे लेखक, प्रबुद्ध चिंतक, ओजस्वी वक्ता आणि कवी आहेत.
त्यांनी आपल्या बारा भावनेच्या रचनेमध्ये गहन चिंतन, मनन आणि अनुभूतीपूर्ण विचार व्यक्त केले आहेत.
डॉ. धर्मशीलाजी - श्वेतांबर स्थानकवासी जैन दर्शनाचे विद्वान डॉ. धर्मशीलाजी महासतीजी यांनी श्रमण संघात सर्व प्रथम "जैन दर्शनातील नवतत्त्वे' या विषयावर मराठीत विस्तृत ग्रंथ लिहिले आहे. त्या ग्रंथावर इ. स. १९७७ साली पुणे विद्यापीठाद्वारा पीएच. डी. पदवी प्राप्त झाली. ह्या ग्रंथाची सरवात जीव तत्त्वापासन होते आणि शेवट मोक्षतत्त्वाने होतो. जीव क्रमाने मोक्षापर्यंत कसे पहोचतो याचे सुंदर विश्लेषण मुमुक्षू ह्याचात प्राप्त करू शकतो ह्या नवतत्त्वात सहावा संवरतत्त्व आहे. त्याच्या अंतर्गत बारा भावनांचा समावेश होतो.
पं. रत्नचद्रजी द्वारा लिखित "भावना शतक'च्या इंग्लिश भाषांतराचे संपादन पण डॉ. धर्मशीलाजी म. नी केले आहे.
डॉ. शीवमुनिजी म. - हे श्वेतांबर स्थानकवासी श्रमण संघाचे चतुर्थ पट्टधर आहेत. यांनी ध्यान साधनेवर सुंदर ग्रंथाची रचना केली आणि ठिकठिकाणी ध्यान शिबिर करून साधकाला शुद्ध आत्मस्वरूपाच्या दिशेने वाटचाल करण्याचा मार्ग दाखवतात. त्यांच्या प्रवचनात आणि पुस्तकात भावनेविषयी विशिष्ट वर्णन प्राप्त होते.