________________
(१८७)
मम्यएणं" अर्थात "
अर्थात "आत्म्याद्वारे आत्म्याचे संप्रेक्षण करा हे या पद्धतीचे बोधवाक्य आहे.
माध्यानामध्ये हठयोगाच्या चक्रांनासुद्धा घेतले आहे. आणि जैन दृष्टीने त्याची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
यांनी भावनेवर 'अमूर्तचिंतन' नावाचे स्वतंत्र पुस्तक लिहिले आहे. याचे गुजराती
को याजिक आणि प्रो. पटेल यांनी केले. यांच्या अन्य पुस्तकामध्येही ठिकठिकाणी भाषांतर प्रा. याज्ञिक
चे वर्णन प्राप्त होते. 'अमूर्तचिंतनाची' हिंदी आवृत्ती सन १९८८ मध्ये प्रकाशित
झाली आहे.
आचार्य नानालालजी - श्वेतांबर स्थानकवासी साधुमार्गी जैन संघाचे आचार्य श्री नानालालजी महाराज यांनी 'समीक्षाध्यान पद्धती' च्या रूपात भावनेचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या 'जिण धम्मो' पुस्तकामध्ये बोधिदुर्लभतेच्या कारणांचे विशद विवेचन आहे. त्यातच सम्यक्त्वाला दृढ बनवण्यासाठी सहा भावनांचे शास्त्रानुरूप वर्णन केले आहे.
शांतीमुनी - हे आचार्य नानालालजी महाराजांचे शिष्य आहेत. यांनी बारा भावना-विषयक "समीक्षण ध्यानः दर्शन आणि साधना'' नामक पुस्तकामध्ये भावनेच्या आधारावर आत्मसमीक्षण आणि ध्यानाचा मार्ग दाखवला आहे. हाच आगमामध्ये वर्णिलेल्या ध्यान विषयाचा निष्कर्ष आहे..ह्यामध्ये बारा भावनांचे समीक्षण बारा प्रकरणामध्ये केले आहे. याचे प्रकाशन सन १९९० मध्ये बिकानेर मध्ये झाले.
विजय जयघोषसूरीश्वरजी - श्वेतांबर मंदिरमार्गी तपागच्छाचे आचार्य श्री विजय भुवनभानुसूरीश्वरजी महाराज' हे एक प्रख्यात आचार्य होते. त्यांचे पट्टालंकार सिद्धांत दिवाकर पूज्य आचार्य श्री विजयजयघोषसूरीश्वरजी महाराजांच्या वि. सं. २०४२ च्या कुर्ला-मुंबई चातुर्मासात सारगर्भित प्रवचन झाले. याचे "भावना नु उद्यान' नामक पुस्तकामध्ये विवेचन झालेले आहे. ह्यामध्ये सोळा भावनांवर सरळ, सुगम भाषाशैलीमध्ये भावनेच्या अंतर्गत असलेल्या सूक्ष्म चिंतनावर प्रकाश टाकला आहे.
__ श्री अरुणविजयजी - श्वेतांबर मंदिरामार्गी तपागच्छाचे विद्वान आणि धर्म प्रभावक मुनी 'श्री अरुणविजयजी' यांनी बडोदरामध्ये आयोजित एका साधना शिबिरामध्ये विशेषरूपाने लोकांना उद्बोधन दिले. हे 'भावना भव नाशिनी' या पुस्तकरूपाने सन १९८३ मध्ये बडोदरामध्ये प्रकाशित झालेले आहे. ह्यामध्ये सर्वसामान्य ज्ञानी लोकांना क्रियात्मकरूपाने भावनेचा अभ्यास करण्यास विशेषत्वाने सांगितले आहे आणि चित्राद्वारे, प्रयागाद्वारे भावनेला समजविण्याचा संदर प्रयत्न केला आहे.