________________
(१८६)
भावना भव नाशिनी' नावाच्या पुस्तकामध्ये भावना विषयक मार्मिक विवेचन हे पस्तकाचे नावच सूक्तीरूप आहे. हे घागरीतील सागराप्रमाणे सारपूर्ण आहे.
डॉ. हकमचंद भारिल्ल - दिगंबर जैन समाजाचे डॉ. हुकमचंद भारिल्ल यांनी बाहर भावना : एक अनुशीलन' नावाचे पुस्तक लिहिले. त्यात बारा भावनांचे सरळ आणि साम्य शैलीमध्ये वर्णन केले आहे. प्रत्येक भावनेच्या विवेचनापूर्वी प्रारंभी स्वरचित
पद्य दिले आहे.
त्यांचे टोडरमल स्मृतीभवन जयपुरच्या संचालनामध्ये मुख्य स्थान आहे. हे देशा विदेशात विभिन्न ठिकाणी प्रवचन करतात आणि जैन धर्माचा प्रचार करतात.
पंडित शोभाचंद्र भारिल्ल - हे राजस्थानच्या 'व्यावर' मध्ये जैन दिगंबर परंपरेचे होते. परंतु यांनी श्वेतांबर, दिगंबर या दोन्ही संप्रदायाच्या शास्त्राचे गहन अध्ययन केले. यांनी संप्रदाय भेद न ठेवता विभिन्न संप्रदायाच्या साधुसाध्वी यांना शिकविले. युवाचार्य श्री मिश्रीमलजी महाराज यांच्या निर्देशनामध्ये प्रकाशित झालेल्या अनेक आगमांचे भाषांतर आणि संपादन यांनी केले.
'भावनायोगाचा विषयामध्ये यांनी "भावना'' नावाची अत्यंत लघुकाय पद्यबद्ध रचना केली आहे. परंतु 'भाव' आणि 'भाषा' यांच्या दृष्टीने ती अत्यंत प्रभावशाली आहे.
आचार्य तुलसी - हे श्वेतांबर तेरापंथी संप्रदायाचे नववे आचार्य होते. यांनी आपल्या 'मनोनुशासनम्' पुस्तकामध्ये बारा भावनांचे सुंदर वर्णन केले आहे. तसेच मैत्री इत्यादी चार भावना, जिनकल्पी पाच भावनांचा उल्लेख केला आहे.
मानसिक संतुलन ठेवण्यासाठी आणि शांती प्राप्त करण्यासाठी यांनी 'मनोनुशासनम्' या पुस्तकाचे लेखन केले. मनाला केंद्रित करण्यासाठी आणि मानसिक विकास करण्यासाठी भावनेची काय उपयोगिता आहे, ह्यावर सुंदर विवेचन केले आहे.
यांच्या दुसऱ्या अनेक रचना आहेत. त्यामध्ये चरित्र, कथा आणि दर्शनसाहित्य यांचा समावेश होतो.
आचार्य महाप्रज्ञ - हे तेरापंथी संप्रदायाचे दहावे अधिनायक आहेत. जैन दर्शनचे उच्चकोटीचे विद्वान आहेत. जैन योगक्षेत्रामध्ये हे प्रेक्षाध्यानाच्या रूपात एका नवीन पद्धतीचे प्रणेता आहेत. 'श्री सत्यनारायण गोयंका' यांच्याकडून प्रसारित बौद्ध परंपरेच्या विपश्यना' नामक ध्यानपद्धतीशी अत्यंत मिळतीजुळती आहे. "सम्पिख्खेय अप्पग