________________
(१८५)
आचार्य आनंदऋषिजी - श्रमणसंघाचे द्वितीय पट्टधर आचार्य सम्राट पूज्य
ती महाराज' जैन दर्शन आणि आगमाचे गंभीर अध्येता होते.
श्री आनंदऋषिजी महाराज' जैन
यांना भावनायोगामध्ये विशेष रूची होती. भावनेच्या विविध पक्षावर त्यांचे नेहमी कितन, मनन चालत होते. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचे प्रेरक यवचन 'आनंद प्रवचन' या नावाने अनेक भागांमध्ये विभाजित आहे.
त्यांच्या 'भावनायोग' नामक पुस्तकामध्ये प्रथम अशुभ भावनेचे वर्णन केलेले आहे कारण अशुभ भावनेला समजल्याशिवाय त्याचा त्याग होऊ शकणार नाही. अशुभ भावना जीवनासाठी विष आहे. म्हणून प्रथम त्याचे ज्ञान प्राप्त करून नंतर शुभ भावनारूपी अमत मार्गामध्ये प्रवेश केला पाहिजे. या हेतूनेच त्यांनी प्रथम अशुभ भावनेचे विवेचन केले असावे. ह्यामध्ये 'भावना' शब्दाची परिभाषा, स्वरूप, भेद, प्रभेद इत्यादींचे विस्तृत वर्णन आहे. हे मुमुक्षूसाठी पठनीय आहे. ह्या पुस्तकाचे मराठी भाषांतर सुद्धा झाले आहे.
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्राचे हे महान संत होऊन गेले. यांचा जन्म सन १९०० मध्ये झाला आणि स्वर्गवास सन १९९२ मध्ये झाला.
श्री विजयमुनी शास्त्री - यांनी 'भावनायोगनी साधना' या नावाचे पुस्तक गुजराती भाषेत लिहिले आहे. यांचे विचार तर्कबद्ध आणि क्रांतिकारी होते. यांनी नवयुवकांना अध्यात्म मार्गाकडे आकर्षित करण्यासाठी सन १९७० मध्ये मुंबईत शिबिराचे आयोजन केले. त्यात त्यांनी जे भावनायोगावर उद्बोधन केले ते पुस्तक रूपात प्रकाशित झाले आहे.
__ हे जैन जगाचे महान विद्वान, चिंतक, कवी आणि लेखक होते. श्रीविजयमुनि उपाध्याय श्री अमरमुनी यांचे अंतेवासी होते. उपाध्यायांच्या सान्निध्यामध्ये त्यांनी जैन आणि जैनेतर शास्त्राचे अध्ययन केले आणि अनेक ग्रंथांचे संपादनही केले.
श्री गणेशमुनी शास्त्री - सुप्रसिद्ध कवी, लेखक आणि विचारवंत 'श्री गणेशमुनी शास्त्री' हे राजस्थान केसरी अध्यात्मयोगी उपाध्याय 'पुष्करमुनी' महाराजांचे शिष्य होते.
यांनी 'सरळ भावना बोध' नावाच्या पुस्तकाची रचना केली. त्यात प्रत्येक भावनेवर गितीबद्ध काव्याची जी रचना केलेली आहे ती पाठकांसाठी प्रेरणादायी आहे.
___ श्री राजेंद्रमुनी शास्त्री - उपाध्याय 'श्री पुष्करमुनी' यांचे प्रशिष्य आणि श्रमणसंघाचे तृतीय पट्टधर आचार्य प्रवर देवेंद्रमुनी महाराजांचे सुशिष्य श्री राजेंद्रमुनी शास्त्री'