________________
(१९०)
भावनेचे विशेषरूपाने विवेचन केले आहे. म्हणजे द्वादश भावनेच्या मार्गावर पोहचण्यात सुलभता राहील. शुभभावनेच्या मार्गी जाण्यासाठी अडथळा होणार नाही...
अशुभ भावनेचा आस्रव भावनेतच समावेश होऊ शकतो. पण उत्तराध्ययन, बृहत्कल्पभाष्य, अष्टप्राभृत, भगवती आराधना, मुलाचार इत्यादी ग्रंथामध्ये अशुभ भावनेशी संबंधित अशा प्रवृत्तीचे विशेषत्वाने निरूपण करणे आवश्यक वाटले असेल म्हणून लेखकांनी कान्दर्प इत्यादी अशुभ भावनेचे वर्णन केले आहे. त्या जीवात्म्याला कशाप्रकारे दुर्गतीला नेतात त्याचे इथे थोडक्यात विवेचन केले जाईल.
अष्ट प्राभृतामध्ये आचार्य कुंदकुंदांनी मुमुक्षुजीवाला जागृत करण्यासाठी चतुर्गती भ्रमणाचे कारण अशुद्ध भाव आहे असे सांगून चतुर्गतीच्या दुःखाचे विस्तृत वर्णन केले आहे. त्यात देवलोकाच्या दुःखाचे वर्णन करताना लिहिले आहे की, हे जीवा ! तू कान्दर्पी इत्यादी पाच अशुभ भावनेमुळे नीच देव होऊन स्वर्गात उत्पन्न झाला. १
'स्वर्ग' अथवा 'देवलोक' शब्द म्हटले की असे वाटते की तेथे सुख असेल परंतु स्वर्गातही अन्य ऋद्धिसंपन्न देवांच्या महात्म्याला पाहून आत्यंतिक मानसिक दुःख होते.
देवदुर्गती होण्याचे कारण "स्त्री कथा, भोजन कथा, देशकथा, राजकथा इत्यादी विकथेमध्ये आसक्त होऊन त्यातच एकाग्र झाल्याने आणि जातिकुळ इत्यादी आठ प्रकारच्या मदात उन्मत्त होऊन ज्याचे प्रयोजन अशुभ भावना प्रकट करणे आहे अशा भावनेमुळे अनेकवेळा कुदेव व्हावे लागते. २
जोपर्यंत भाव विशुद्धी होत नाही तोपर्यंत सिद्धीही प्राप्त होत नाही. बाहुबली श्री ऋषभदेवांचे पुत्र दैहिक परिग्रह सोडून निर्ग्रथ मुनी झाले. तरी मानकषायाने कलुषित परिणामाने सिद्धी प्राप्त झाली नाही आणि जेव्हा मान कषाय नष्ट झाला तेव्हा लगेचच केवलज्ञान उत्पन्न झाले.
दुसरे उदाहरण द्वैपायनऋषींचे आहे. नववे बलदेव बलभद्र यांनी बाविसावे तीर्थंकर श्री नेमिनाथ प्रभूंना विचारले की द्वारका नगरी समुद्रात आहे हिचे आस्तित्व किती काळ असेल ?
तेव्हा भगवान म्हणाले, "रोहिणीचा भाऊ द्वैपायन, तुझा मामा बारा वर्षानंतर मदिरेच्या निमित्ताने क्रोधित होऊन ह्या नगरीला जाळून टाकेल.'
हे ऐकून द्वैपायन दीक्षा घेऊन पूर्व देशात निघून गेले. बारा वर्षे पूर्ण करण्यासाठी