________________
(१७९)
यादी विविध विषयांवर त्यांनी ग्रंथांची रचना केली. हे सिद्धांत आणि
अध्यात्म, पुराण इत्यादी विवि
अध्यात्म दोन्हींमध्ये निष्णात होते.
यांनी प्रमेयरत्नाकर, भरतेश्वराभ्युदय काव्य आणि पंजिका सहित धर्मामृत अशा गंधांची रचना केली. धर्मामृताचे 'अनगार' आणि 'सागर' असे दोन भाग पडतात.
श्री स्वतःच टीका आणि पंजिका रचल्या आहेत. तसेच दुसऱ्या ग्रंथावर सुद्धा टीका लिहिलेल्या आहेत.
अनगार धर्मामृताच्या सहाव्या अध्ययनामध्ये बारा भावना आणि सातव्या अध्ययनामध्ये अशुभ आणि शुभ भावनेचा उल्लेख झाला आहे.
अमितगती आचार्य - हे मोठे प्रकांड विद्वान होते. विक्रम संवत्सराच्या अकराव्या शतकात मालवचा ‘राजा मुंज' याच्या काळात हे होऊन गेले. यांचे धर्मपरीक्षा, सुभाषितरत्न, योगसार, पंचसंग्रह आणि श्रावकाचार हे ग्रंथ मुद्रित झालेले आहेत. धर्मपरीक्षा ग्रंथ यांनी वि. सं. १०७० मध्ये समाप्त केला होता. ह्यांचे तत्त्वभावना आणि बृहद्सामायिक पाठ, वैराग्य आणि आत्मज्ञानाचे मनोहर नंदनवन आहे. ह्यामध्ये 'आत्मभावना' आणि 'मैत्री' इत्यादी चार भावनांचे सुंदर वर्णन केले आहे. ते अत्यंत प्रसिद्ध आहे.
- महाकवी रइधू - इसवीसनाच्या १४व्या, १५ व्या शताब्दीमध्ये महाकवी रइधू द्वारे प्रणीत अपभ्रंश रचनेच्या प्राचीन अप्रकाशित हस्तलिखिताच्या आधाराने डॉ. राजाराम यांनी संपादन आणि भाषांतर केले.
त्यांच्या 'पासणाहचरिउ' मध्ये कमठ द्वारा जळत्या काष्ठामध्ये युगल सर्प पाहून पार्श्वकुमारांनी दयार्द चित्ताने त्यांच्या कानात मंत्र दिला तो पवित्र मंत्र ऐकून ते सर्प देव झाले आणि तापस सुद्धा मरून देव झाला.
सर्पाला प्राणरहित पाहून पार्श्वकुमार विचार करू लागले की, “संसारामध्ये जीवांना वाचविणारा कोणीच नाही.
इंद्र, धरणेंद्र इ. सर्वजणच आयुष्य क्षय झाल्यानंतर मृत्यूलाच प्राप्त होतात." अशाप्रकारे बारा भावनांचे ह्यामध्ये वर्णन केलेले आहे. त्यांचे धनकुमार चरित्र, जसहरचरित्र वृत्तसार, सम्यक्त्वभावना इत्यादी अनेक ग्रंथ आहेत. ह्यांचा काळ वि. सं. १४८१ ते १५३६ च्या दरम्यान मानला जातो.
उपाध्याय श्री विनयविजय - यांनी 'शांतसुधारस' नामक ग्रंथाची रचना गंधपुर नगरामध्ये वि. सं. १७२३ मध्ये केली. ह्यावेळी जंबसर जवळ असलेले गांधार हे ठिकाणच