________________
(१७८)
हेमचंद्राच्या उपदेशाने प्रभावित होस
सात श्रद्धापूर्वक मानत होते. अहिंसावादी, धर्मरक्षक राजा कुमारपाल सद्धा देशाने प्रभावित होऊन जैन धर्माचा अनुयायी झाला आणि त्यांने गुजरातला न राज्य बनविण्याचा प्रयत्न केला. हेमचंद्रांच्या शरीराची कांती 'हेमहोती म्हणून ते हेमचंद्र नावाने प्रसिद्ध झाले. यांनी 'योगशास्त्रा' नावाचा ग्रंथ आहे त्यामधील पातंजलयोगसूत्रात निर्दिष्ट अष्टांगायोगाच्या क्रमाने गृहस्थ जीवन साधजीवनाच्या आचार साधनेचे जैनागमाच्या अनुसार वर्णन केले आहे.
ह्याच्या प्रथम प्रकाशामध्ये पाच महाव्रताच्या पंचवीस भावनांचे आणि चतुर्थ मध्ये अनित्यादी बारा भावनांचे तसेच मैत्री इत्यादी चार भावनांचे वर्णन केले
आहे.
आचार्य सोमदेव - हे एक फार मोठे महाकवी होते. यांनी नीतिवाक्यामृत यशस्तिलक चंपू, इत्यादी ग्रंथाची रचना संस्कृतमध्ये केली. यशस्तिलक चंपूमध्ये बारा भावनांचे वर्णन अत्यंत सुंदर काव्यात्मक शैलीमध्ये केले आहे. ह्या चंपू काव्याची रचना चैत्रशुक्ला १३ वि. सं. १९१८ मध्ये गंगाधारा नगरी येथे पूर्ण झाली. ह्याच्यावर श्रुतसागरसूरींची टीका आहे.
___ जिनचंद्र - यांनी अभयदेव यांच्या अभ्यर्थनेने 'संवेग रंगशाला' ग्रंथाची रचना वि. सं. ११२५ मध्ये केली. ह्यामध्ये प्रसंगानुसार बारा भावनांचे वर्णन केले आहे. ते संवेग भावनेच्या अंतर्गत आहे.
___ आचार्य शुभचंद्र - भर्तृहरी, भोज, मुंज आणि शुभचंद्र हे समकालीन होते. १०२७ ते १०५० या दरम्यान त्यांचा काळ मानला जातो. हे दिगंबर परंपरेचे सन्मानित आचार्य होते. त्यांचा ज्ञानार्णव म्हणजे ज्ञानसागर आहे.
आचार्य शुभचंद्र हे एक मोठे योगी होते. ज्ञानार्णवामध्ये जैनयोगाचे विशद विवेचन आहे. त्या अंतर्गत त्यांनी भावनेला अत्यंत महत्त्व दिले आहे. त्यांनी योगविषयक वर्णन करण्यापूर्वी दुसऱ्या सर्गामध्ये भावनेचे विवेचन केले आहे. ह्यावरून भावनेला त्याकाळी केवढे महत्त्व होते ते समजते.
पंडित आशाधर - ह्यांच्या द्वारे रचलेल्या 'धर्मामृताची' कन्नड लिपीमध्ये लिहिलेली प्रत वि. सं. १४१८ मध्ये प्राप्त झाली. काही विद्वानांच्या मतानुसार यांचा काळ वि. सं. १२३० ते १३०० पर्यंतचा असावा असे मानले जाते. पंडित आशाधर हे त्यांच्या काळातील बहुश्रुत विद्वान होते. न्याय, व्याकरण, साहित्य, कोष, वैधक, धर्मशास्त्र,