________________
(१७७)
PM ARMAHAT
Sonawarawasana
पर्यतचा मानला जातो. दिगंबर
SEARCH
जातो दिगंबर परंपरेचे सर्वमान्य षदखंडागमाच्या आधारावर यांनी की रचना केली आहे. कर्नाटकाचे शासक राजमल्लदेव आणि त्यांचे मंत्री श्री बामण्डराय' द्वारा हे विशेषरूपाने सन्मानित होते.
बामण्ड रायांचे नाव दक्षिण भारतामध्ये अत्यंत प्रसिद्ध होते. त्यांनी बेगोलामध्ये ५६ फूट उंच, विशाल प्रतिमा निर्माण केली. आचार्य नेमिचंद्र यांचे गुरू
श्री नेमिचंद्र यांनी प्राकृत 'बृहदद्रव्य' या संग्रहाची रचना केली. त्यात द्रव्याचे आणि न तत्त्वांचे अथवा नऊ पदार्थांचे विशद विवेचन आहे. त्यावर 'ब्रह्मदेव' यांची संस्कृत
SOORARYABADMASTERYHUNANE
वृत्ती आहे.
द्रव्यसंग्रहाच्या संवर तत्त्वामध्ये 'व्रतसमिती' आणि 'गुप्ती' याबरोबर आचार्य नेमिचंद्र यांन धर्मानुप्रेक्षेची चर्चा केली आहे. टीकाकारांनी ह्या शब्दाचे विवेचन करताना बारा भावनेचे वर्णन केले आहे.
पुट्ट्या स्वामी - हे बृहद्रव्य संग्रहाचे दुसरे टीकाकार आहेत. हे तमिलदेशाचे निवासी मोठे विद्वान होते. ह्यांच्या टीकेचे नाव 'भावनासार' आहे. ती 'श्लोकबद्ध' आहे. आचार्य देशभूषण यांनी ह्याचे हिंदीमध्ये भाषांतर केले आहे. ह्यांच्यामध्ये बारा भावनांचे सुंदर शब्दावलीमध्ये वर्णन केले आहे.
आचार्य देवसेन - यांनी भावसार, आराधनासार, दर्शनसार आणि तत्त्वसार इत्यादी आध्यात्मिक विषयावर अनेक ग्रंथांची रचना केली आहे. त्यात 'तत्त्वसार' अत्यंत प्रसिद्ध आहे. परंतु दर्शनसाराच्या शेवटी यांनी ह्या ग्रंथाची रचना वि. सं. ९९० माघ शुक्ल दशमी असे लिहिले आहे. ह्यावरून हे स्पष्ट होते की यांचा काळ दहाव्या शताब्दीचा उत्तरार्ध असावा. तत्त्वसारामध्ये त्यांनी शद्धोपयोगमलक भावनेचे किंवा अनचिंतनाचे वर्णन केले आहे.
आचार्य हेमचंद्र - हे विक्रम संवत्सराच्या बाराव्या शताब्दीचे एक प्रख्यात आचार्य होऊन गेले. जैनागमाचे हे प्रकांड पंडित होते. तसेच व्याकरण, साहित्य, छंद, अलंकार, काव्य, न्याय, दर्शन, योग इत्यादी सगळ्या विषयांवरही यांचा विशिष्ट अधिकार होता. आणि उपरोक्त सर्व विषयांवर त्यांनी महत्त्वपूर्ण ग्रंथाची रचना केली. त्यांच्या विशाल, ज्ञानामुळे त्यांना 'कलिकाल सर्वज्ञ' या नावाने संबोधिले जात होते.
गुजरातच्या 'काठियावाड'मध्ये प्रारंभीच्या शताब्दीतसुद्धा जैनधर्माचा प्रचार होता. मध्ययुगात शिवोपासक सिद्धराज जयसिंह हे महान जैनाचार्य हेमचंद्र यांना विशिष्ट
Desyaulupi
S Ramayan
a
ASTHANKare
NADDA
Hos
Sadio