________________
(१७६)
तर कोणत्याही ग्रंथात प्राप्त होत नाही. पंडित जूगलकिशोर यांनी ह्यांचा
की तसे विवेचन इतर कोणत्याई
काळ दहावी शताब्दी मानला आहे.
पार्थसिद्धयुपायाच्या सातव्या सकलचारित्र्य अधिकारामध्ये बारा भावनांचा आमोल्लेख झाला आहे. ज्याची पूज्य क्षुल्लक धर्मानंद यांनी विस्तृत व्याख्या केली आहे.
जिनभद्रगणि - श्वेतांबर संप्रदायामध्ये जिनभद्रगणि क्षमाश्रमण नावाचे एक चार्य झाले. यांनी 'विशेषावश्यक' नामक एका उच्चकोटीच्या ग्रंथाची रचना केली. यांचा पर प्रथम सहस्राब्दीचा अंतिम भाग मानला जातो. ह्यामध्ये तत्त्वांचे व्यवस्थित आणि यक्तियुक्त विवेचन आहे. तीर्थकरगोत्रबंधाच्या कारणाचा सुद्धा ह्यात उल्लेख झाला आहे. यांनी 'ध्यानशतकाची' रचना केली. त्यात एके ठिकाणी असा उल्लेख आहे की, 'जेव्हा ध्यान उपरत होते तेव्हा मुनीने सतत अनित्यादी भावनेमध्ये विचरण करावे. त्यातच ज्ञान, दर्शन, चारित्र्य आणि वैराग्य भावनांचे सुद्धा वर्णन आहे.
हरिभद्रसूरी - हे एक प्रख्यात विद्वान आचार्य होऊन गेले. असे म्हटले जाते की यांनी १४०० प्रकरण ग्रंथांची रचना केली. यांचा काळ ७०० ते ७५० मानला जातो. हे आध्यात्मिक योगी होते. यांनी जैन धर्माची जी प्रभावना केली ती वास्तविक इतिहासामध्ये गौरवास्पद आहे.
'जैन योग' अथवा 'अध्यात्मयोग' यावर यांनी 'योगदृष्टी समुच्चय' आणि 'योगबिंदु' नावाचे दोन ग्रंथ संस्कृतमध्ये आणि 'योगशतक' आणि 'योगविंशिका' नावाची दोन पुस्तके प्राकृतमध्ये लिहिली.
टीकाकारांमध्ये ह्यांचे विशिष्ट महत्त्वाचे स्थान आहे. यांच्या 'समराइच कहा' यामध्ये सदाचारी नायक आणि दुराचारी प्रतिनायक यांच्या जीवनसंघर्षाची कथा लिहिलेली आहे. नायक शुभ परिणतीला शुद्ध परिणतिच्या रूपात परिवर्तित करून शाश्वत सुख प्राप्त करतो आणि प्रतिनायक हा अनंत संसाराचा पात्र बनतो. अशाप्रकारे शुभाशुभ भावाचे ह्यामध्ये वर्णन प्राप्त होते.
जिनसेनाचार्य - यांचा काळ ई. स. ८०० मानला जातो. हे मोठे कवी होते. महापुराणामध्ये ह्यांनी त्रेसष्ट शलाका पुरुषांच्या चरित्राचे लेखनकार्य सुरू केले. परंतु तेव्हाच त्यांचा स्वर्गवास झाला म्हणून त्या ग्रंथाला त्यांचे शिष्य गुणभद्राचार्यांनी पूर्ण केले. यामध्ये पाच महाव्रताच्या पंचवीस भावनांचे आणि अनित्यादी बारा भावनांचा उल्लेख झाला आहे.
आचार्य नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती - यांचा काळ सन १११८ ते ११५३