________________
(१७५)
योगेंदुदेव - ह्यांचा ‘परमात्मप्रकाश' नामक ग्रंथ प्रसिद्ध आहे. याचे दोन अधिकार
३५३ दोहे अपभ्रंश भाषेत रचलेले आहेत. यांचा काळ सहावा शतक मानला जातो. ह्यामध्ये शुद्धात्मभावनेचा भावपूर्ण उल्लेख झाला आहे. ह्यांच्या योगसार, दोहापाहुड, अमृतशिती निजात्माष्टक, श्रावकाचार या ग्रंथांवर लक्ष्मीचंद्र यांची टीका आहे...
स्वामी कार्तिकेय - कार्तिकेयानुप्रेक्षा ( कत्तिगेयाणुवेक्खा) याचे रचनाकार 'स्वामी कार्तिकेय' अथवा 'स्वामीकुमार' आहेत. प्राकृत आणि जैन विद्येचे सुप्रसिद्ध विद्वान डॉ. ए. एन. उपाध्ये यांद्वारे संपादित कार्तिकेयानुप्रेक्षा यामध्ये उपाध्ये यांनी त्यांच्या काळाची गवेषणा करण्याचा प्रयत्न केला आहे.
आहेत.
आचार्य शुभचंद्रांनी कार्तिकेयानुप्रेक्षेवर संस्कृत टीकेची रचना केली. शुभचंद्रांचा काळ ई. स. १५५६ मानला जातो.
त्यापूर्वी 'ब्रह्मदेव' यांचा काळ मानला जातो. म्हणजे तेरावी शताब्दी असा काळ मानला आहे. त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये कार्तिकेयानुप्रेक्षाची गाथा उद्धृत केली आहे. यावरून असे सिद्ध होते की स्वामी कार्तिकेय ब्रह्मदेवांच्या पूर्वी होऊन गेले.
त्यानुसार डॉ. उपाध्ये यांनी असे सूचित केले आहे की स्वामी कार्तिकेय यांचा काळ बारावी शताब्दीच्या अगोदरचा असावा. काहीजणांच्या मते स्वामी कार्तिकेय हे कुंदकुंदाचार्यांच्या नंतरचे असावेत.
कार्तिकेयानुप्रेक्षेमध्ये अनित्यादी बारा अनुप्रेक्षा किंवा भावनेचे विस्तृत वर्णन केले आहे. प्रसंगानुसार जीव, जीवन इत्यादी सात तत्त्वांचे सुद्धा स्वरूप वर्णन झाले आहे. अनुप्रेक्षेबरोबर जैन धर्माच्या मूलभूत तत्त्वांचा आणि चिंतनीय विषयांचा सुद्धा ह्यात समावेश झाला आहे.
अमृतचंद्रसूरी - यांनी पुरुषार्थसिद्धयुपाय नावाच्या स्वतंत्र ग्रंथाची रचना केली. जो 'चरणकरणानुयोग' याचा सर्वांगिण परिपूर्ण अद्भूत ग्रंथ आहे. यांनी आचार्य कुंदकुदांच्या समयसाराचे भाष्य पद्यमय, रसमय शब्दात, अर्थपूर्ण भाषेत केले आहे. प्रवचनसार, पंचास्तिकाय, तत्त्वार्थसार, लघुतत्त्वस्फोट इत्यादी सारगर्भित साहित्याची सरलतापूर्ण टीका रचली आहे.
ह्यांच्या पुरुषार्थ सिद्धयुपाय यामध्ये अहिंसेचे इतके सुंदर विवेचन झालेले आहे