________________
(१७४)
भगवती आराधनेमध्ये सम्यग्दर्शन, ज्ञान, चारित्र, तप ह्या चार गोष्टींच्या हो विस्तृत विवेचन आहे. ह्या ग्रंथावर जितक्या टीका लिहिल्या गेल्या आहेत चितच कोणत्या दुसऱ्या ग्रंथावर लिहिल्या गेल्या असतील. ह्यावरून ह्या ग्रंथाचे
महत्त्व कळते.
ह्यात कंदर्प इत्यादी पाच संक्लिष्ट भावना, तप इत्यादी पाच जिनकल्पी भावना, अभी इत्यादी चार योगभावना, अनित्यादी बारा वैराग्य भावना, पाच महाव्रताच्या पंचीवस भावना अशाप्रकारे जवळ जवळ सर्व मुख्य भावनेचे प्रतिपादन झालेले आहे. भगवती आराधनेवर अपराजित सूरी त्यांनी संस्कृतमध्ये टीका लिहिली आहे.
आचार्य समंतभद्र - हे विक्रम संवत्सराच्या तिसऱ्या शतकात होऊन गेले. जैन संस्कृतीच्या प्रभावी आचार्यांमध्ये समंतभद्र यांचे स्थान अत्युच्च आहे. ह्यांचे 'रत्नकरंड श्रावकाचार' नामक ग्रंथ अत्यंत प्रसिद्ध आहे.
त्यातील भावना अधिकारामध्ये द्वादश भावनांचे अत्यंत साध्या, सोप्या भाषेत वर्णन आहे आणि षोडशकारण भावनेचे सुद्धा वर्णन आहे. ह्यांनी आप्तमीमांसा, युक्त्यानुशासन स्वयंभूस्तोत्र, जिनस्तुतीशतक, जीवसिद्धी इत्यादींचीही रचना केली आहे.
आचार्य पूज्यापाद - हे इसवीसनाच्या पाचव्या, सहाव्या शतकात होऊन गेले. ह्यांचे नाव प्रथम 'देवनंदी' होते. देवांकडून त्यांच्या चरणाची पूजा झाली म्हणून त्यांचे नाव देवनंदी पडले अशी अनुश्रुती आहे. ह्यांचे सर्वार्थसिद्धी, समाधीतंत्र (समाधी शतक) इष्टोपदेश, सिद्धमुक्ती इत्यादी ग्रंथ आणि जैनेंद्र व्याकरण जैन जगामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे.
'सर्वार्थसिद्धी' मध्ये बारा भावनांचे आणि 'समाधीशतक' यामध्ये शुद्धात्मभावाचे वर्णन अत्यंत हृदयस्पर्शी झाले आहे.
समाधीशतकामध्ये भेदज्ञानाची भावनाविस्तृतपणे आहे आणि 'आत्म्याला समाधी सुख मिळावे' असा उपदेश दिला आहे.
अकलंकदेव - ह्यांचा काळ ई. ६२० ते ६८० मानला जातो. ते जैन न्यायाचे प्रतिष्ठाता होते. ह्यांचे अष्टशती, प्रमाणसंग्रह, न्यायनिश्चय, लघीयस्त्रय, सिद्धीविनश्चय आणि तत्त्वार्थ राजवार्तिक नामक ग्रंथ अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. जैन प्रमाणशास्त्राचे प्राचीन मर्यादेच्या अनुकूल प्रतिपादन करण्याचे श्रेय श्री अकलंकदेव यांना आहे.