________________
(१७३)
न शास्त्राचार्य, सुप्रसिद्ध विद्वान मुनी 'पूज्य घासीलालजी महाराज' यांनी बत्तीस संस्कत, हिंदी आणि गुजराती टीका लिहिल्या. यांनी तत्त्वार्थसूत्रावर सुद्धा टीका आहे. ह्या ग्रंथाचे सर्व धर्मावलंबी पठन करतात. आजही ह्यावर अनेक संत, विद्वान, नामक पुस्तके लिहित आहेत. ह्यावरूनच ह्या ग्रंथाची महानता सिद्ध होते. ह्यात सान, आचार, भूगोल, खगोल, आत्मविद्या पदार्थविज्ञान, कर्मशास्त्र इ. अनेक विषयांचे संदरपणे निरूपण केलेले आहे.
ह्यात संवर तत्त्वाच्या अंतर्गत बारा अनुप्रेक्षांचा उल्लेख झाला आहे. आणि पाच महावताच्या पंचवीस भावना, मैत्री इत्यादी चार योगभावनांचा सुद्धा उल्लेख झाला आहे. तत्त्वार्थसूत्रामध्ये बारा भावनांचे विस्तृत विवेचन न करण्याचे कारण हेच असावे की आचार्य उमास्वातींद्वारे रचलेल्या 'प्रशमरति' प्रकरणामध्ये ह्या भावनेचे विस्तृतपणे विवेचन केलेले आहे. आणि ते अत्यंत प्रभावी आहे.
_आचार्य वट्ट के र - 'मूलाचार' नामक ग्रंथाच्या रचनाकालासंबंधी श्री कैलाशचंद्रशास्त्री यांसारख्या प्रौढ शास्त्रज्ञ विद्वानांचे असे म्हणणे आहे की हा ग्रंथ कुंदकुंदकालीन (८ इ. पू. ४४ ई.) अर्थात इसवीसनाच्या प्रारंभीच्या काळात रचलेला
आहे.
ह्या ग्रंथाच्या कर्त्याविषयी वाद आहे. कोणी या ग्रंथाला कुंदकुंदाचार्य रचित मानतात, तर कोणी 'वट्टकेराचार्य' रचित मानतात. परंतु पंडित नाथुराम प्रेमी मुख्तारच्या मतानुसार 'बट्टकेर' नामक कन्नडींग दिगंबर आचार्य हे ह्या ग्रंथाचे रचनाकार आहेत.
मूलाचाराच्या १२४३ या गाथेमध्ये गणधर रचित प्रथम अंगसूत्र आचारांगाचा, अल्पज्ञ शिष्यांसाठी सरळ भाषेत बारा अधिकारामध्ये उपसंहार केला आहे. ह्यात मूळगुण, बृहत्प्रत्याख्यान, संक्षिप्त प्रत्याख्यान, समयाचार, पंचाचार, पिंडशुद्धी षडावश्यक, द्वादशानुप्रेक्षा, अणगार भावना, समयसार, शीलगुणप्रस्तार आणि पर्याप्ती हे अधिकार प्रतिपादिले आहेत.
मूलाचारामध्ये अनित्यादी बारा भावना आणि मैत्री इत्यादी चार भावना यांच्या अतिरिक्त अशुभ भावनेचे सुद्धा वर्णन झाले आहे.
आचार्य श्रीशिवार्य - 'मूलाचार' आणि शिवार्यद्वारां विरचित 'भगवती आराधनेचा' रचनाकाळ जवळ जवळ सारखाच असावा असे मानले जाते. अर्थात शिवार्य, बट्टकेर आणि कुंदकुंदाचार्यांचा काळ इसवीसनाच्या प्रारंभीचा काळ असावा असे मानले जाते.