________________
भावना मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. भावनेत भव-भयाने मुक्त करण्याचे अपार सामर्थ्य असल्याने मनुष्याची परम हितैषिणी म्हटली जाते. मनुष्यजन्मात प्राणिजन्म मरणाच्या चक्राला स्थगित करण्याची जी क्षमता ठेवतो त्या क्षमतेच्या मागे भावनेचे मुख्य बळ आहे. आणि म्हणूनच भावनेला भवनाशिनी म्हटले आहे.
आपल्या ह्याच विशिष्टतेच्या आधारावर भावनेला 'योग'च्या श्रेणीत घेतले - जाते. 'योग'चा सामान्य अर्थ 'मिलन' आहे. आणि विशेष अर्थ 'आत्म्याचा
परमात्म्याबरोबर मिलन करून देणाचे साधन'. मोक्षप्रद योग अनेक प्रकारचे आहे. त्यात भावनायोगाला सर्वोत्कृष्ट स्थान मिळाले आहे. सूत्रकृतांग सूत्रानुसार ज्या साधकाचा अन्तरात्मा भावनायोगाने विशुद्ध होतो तो आत्मा पाण्यात तरंगणाऱ्या नौकेप्रमाणे संसारसागराला पार करून सर्व दुःखातून मुक्त होऊन परम सुखाला प्राप्त करतो.
वास्तविक भावनायोगाचे लक्ष्य वैराग्य आहे आणि वैराग्यच मोक्ष रूपात फलिभूत होतो. इथे हे विशेष ध्यानात ठेवण्यासारखे आहे की भावनेने साधित वैराग्य ज्ञानाधारित असते. म्हणून ते अटळ आणि स्थिर असते. भावनेच्या पुढची पायरी ध्यान आणि समाधी आहे.
अन्तरात्म्याच्या भावनेप्रमाणेच मनुष्याचा सर्व बाह्य व्यवहार आकार ग्रहण करतो. अशा प्रकारे भावना जीवनाची निर्मात्री आहे अशुभ भावना मनुष्याला दुर्जन, अन्यायी व दुराचारी बनवते. शुभ भावना त्याला सज्जन, धर्मप्रिय आणि सदाचारी बनवते, तर शुद्ध भावना जीवत्म्याला परमात्मस्वरूप बनवते.
अशा 'भावनायोग' सारख्या आध्यात्मिक विषयाच्या वेगवेगळ्या ग्रंथात अनेक परिभाषा प्राप्त होतात. त्याचे समीक्षण करून प्रस्तुत प्रकरणात देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकरण ३: 'अर्धमागधि आगमात भावनेचे विवेचन'
आचारांग सूत्र हे आगम ग्रंथाचे सर्व प्रथम अंग ग्रंथ आहे. ह्याच्या पंधराव्या अध्ययनात पाच महाव्रतांच्या पंचवीस भावनांचे विस्तृत विवेचन आहे. ह्या पंचवीस भावना पाच महाव्रतांच्या रक्षणासाठी आहेत. प्रत्येक महाव्रतरूपी रत्नाच्या रक्षणासाठी भावनारूपी पाच रक्षक नियोजित केले गेले आहेत. जर पहारेकरी सावधान असतील तर असंयमरूपी चोर साधकाच्या आचरण कोषातून ह्या रत्नांची चोरी करू शकणार नाहीत. अशा प्रकारे आगमग्रंथात अनित्यादी बारा भावना आणि मैत्री इत्यादी चार
NAMORE