________________
(७)
भावनांचे कोठे कोठे वर्णन दिसून येते. त्याचा संशोधनात्मकतेने अभ्यास करून तिसऱ्या प्रकरणात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रकरण ४
अकल्याणकारी अशुभ भावना'
आगमोत्तर काळात ज्यात लेखक कवी आणि संतांनी भावनेविषयी गद्य, पद्म अथवा मिश्र रूपात रचना केल्या आहेत, त्यांचा थोडक्यात परिचय व अशुभ भावनेच्या हेयतेचे विवेचन प्रस्तुत प्रकरणात केले आहे.
शुभ भावनेच्या पूर्वीच अशुभ भावनेचे वर्णन करणे आवश्यक वाटले कारण अशुभला जाणल्याशिवाय शुभ अथवा शुद्ध भावना हृदयंगम करणे अशक्य आहे. अशुभ भावना इतक्या भयानक आहेत की मनात त्याची मात्र उपस्थिती पण दुष्परिणाम घडविण्यासाठी पर्याप्त आहे. दुष्कर्मात प्रवृत्त न होता मात्र भावनेनेपण जीवात्म्याची अधोगती होते, अशा हिंसा इत्यादींच्या पाच कपायच्या चार आणि कांदर्पी आदी पाच भावनांचे पंचवीस असे एकंदरीत ३४ अशुभ भावनांचे वर्णन प्रस्तुत प्रकरणात केले आहे.
प्रकरण ५ ' आगमोत्तरकाळच्या जैन साहित्यात भावनेचे निरूपण'
या प्रकरणात वैराग्य भावनेचे विवेचन केले आहे. आगम ग्रंथात वैराग्य भावना विखुरलेल्या अवस्थेत मिळतात. पण आगमोत्तर काळाच्या ग्रंथात त्यांना क्रमबद्ध केले गेले आहे. ह्या सर्व भावना अनासक्ती अथवा वैराग्याचा मूळ आधाररूप आहेत. म्हणून यांना 'द्वादश बैराग्य भावना', 'बारह भावना' इत्यादी नावांनी ओळखले जाते.
मनात निर्वेद - वैराग्य उत्पन्न करणाऱ्या सर्व भावनांना वैराग्य भावनेच्या अंतर्गत मानले जाते. त्या दृष्टीने भावनेची कोणतीच निश्चित संख्या सांगता येत नसली तरी विद्वज्जनांनी असंख्य चिंतनधारा आणि भावतरंगाचे वर्गीकरण बारा भावनांच्या रूपात केले आहे.
ह्या भावना क्रमशः उच्चपासून उच्चतम स्थितीपर्यंत साधकाला नेतात. भावनांचे महत्त्व असाधारण आहे. भावनायोगाची साधना करणाऱ्या संत, योगी आणि सर्व साधकांना स्वतःच्या अंतरिक ऐश्वर्याचे, तप जप संयमाचे भावात्मक सुख प्राप्त होते.
भावनायोग हा व्यवधानरहित मोक्षाचा राजमार्ग आहे.
भावनायोग हे परमसुख आणि शांती देणारा आहे.