________________
विरळ आणि अविकसित अवस्थेत आहेत. अच्यवत रूपात आहेत. चिंतन, मनन, विवेक हा निर्णयाच्या क्षमतेचे वरदान तर मात्र मानवालाच मिळाले आहे. हीच विचारशीलता व भावना मनुष्याच्या श्रेष्ठत्वाची आधारशिला आहे.
मनुष्य मनाचा ईश्वर, मनाचा स्वामी आहे. त्याच्या उत्थान-पतनाचे कारण भावना आहे. अशुभ भावनेने पतन व शुभभावनेने उत्थान हे मनुष्याच्या मनाचे व्यक्त रूप आहे. भावना मनुष्य जीवनाचे निर्माण करणारी आहे. हीच मानव-जीवन महलाची मजबूत आधारशिला आहे.
धर्म- वस्तूचा स्वभाव धर्म आहे. दुर्गतीत पडणाऱ्या जीवांना वाचवणारा धर्म आहे. मनावर विजय मिळविणे धर्म आहे. पाच इंद्रियांना वश करणे धर्म आहे. त्याग, व्रत, नियमांचे पालन करणे धर्म आहे. कषाय जिंकणे धर्म आहे. मोह, ममत्व नष्ट केले तरच जीवाचा अंतर्बाह्य विकास होतो. मोह न सोडता फक्त धार्मिक क्रिया केल्या तर आत्म्याचा विकास होत नाही आणि संसार परिभ्रमण कमी होत नाही. म्हणून धर्माच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे.
___ वाङ्मय अर्थात आगमग्रंथ जैन साहित्यात आगमग्रंथाचे असाधारण महत्त्व आहे. आगम ग्रंथांच्या अभ्यासाने अष्टकर्म नष्ट होतात. आगम ग्रंथाचे चिंतन, मनन करणे हा खरा स्वाध्याय आहे. स्व-आत्मा अध्याय-अभ्यास, निरीक्षण, परीक्षण करणे, स्वतःच्या आत्म्याचे ज्ञान प्राप्त करणे स्वाध्याय आहे. त्या स्वाध्यायाचा एक प्रकार अनुप्रेक्षा आहे. अनुप्रेक्षा, भावना, चिंतन इत्यादी एक प्रकारचे आत्मशुद्धीसाठी असलेले निर्मळ जल आहे. आणि म्हणूनच प्रस्तुत प्रबंधात आत्मशुद्धी, आत्मविकास,
आत्मावलोकन करण्यासाठी भावना-अनुप्रेक्षा यांचा समीक्षात्मक अभ्यास करून माझ्या क्षयोपशमाप्रमाणे आलेखन केले आहे. प्रकरण २ : 'भावनेचा आशय, महत्त्व व थोडक्यात परिचय'
भावनाअनुप्रेक्षा इत्यादी शब्दांची परिभाषा, व्युत्पत्ती आणि मतितार्थ ह्या प्रकरणात व्यक्त करून सोळा भावनांचा थोडक्यात परिचय दिला आहे.
अनादीकाळापासून जीवात्मा संसाराचे चिंतन करत आहे. पण त्याला भावना सांगता येणार नाही, हे तर कर्मबंधाचे कारण आहे. त्यांना अशुभ भावना म्हणू शकू. विचाराचे, विकसित आणि परिपुष्ट रूप भावना आहे. चिंतन अनुचिन्तनाच्या मनोमन्थनाद्वारा प्राप्त नवनीत भावना आहे. विचार भावनेचे प्रारंभिक रूप आहे.