________________
(४)
भावनाबोध पाठमाळा - श्रीमद् राजचंद्रजी बारह भावना - हुकुमचन्द भारिल्ल इत्यादी.
यांच्या अतिरिक्त पण अन्यान्य अनेक आचार्य मुनी आणि विद्वानांच्या रचनेचे अनुसंधानात्मक वृत्तीने अध्ययन केले. हिंदी, मराठी, गुजराती, राजस्थानी इत्यादी आधुनिक भाषांतही जैन सिद्धांत तसेच आचार या संबंधी जे विविध साहित्य प्राप्त झाले त्याचे पण मी व्यापकतेने अवलोकन केले. त्यात भावनेच्या संदर्भात जी सामग्री प्राप्त झाली तिला यथास्थान संयोजित करण्याचा मी प्रयत्न केला.
विद्या आणि साधना कोणत्याही धर्म अथवा संप्रदायाच्या मर्यादेत बांधलेली नसते. हा तर एक सर्वव्यापी, सर्वग्राही आणि सर्वोपयोगी उपक्रम आहे. त्याला विविध परंपरेने संलग्न ज्ञानीजन आणि साधकगण समृद्ध करतात. जैन दर्शन, अनेकांतवादावर आधारित समन्वयात्मक दर्शन आहे. त्या दृष्टीने कोणत्याही प्रकारे सांप्रदायिकतेची संकीर्ण भावना न ठेवता भावना विषयावर जे लेखनकार्य सुरू केले ते प्रस्तुत शोधप्रबंधाच्या रूपात उपस्थित आहे. ते विषय व्यवस्थित मांडण्याच्या दृष्टीने आठ प्रकरणात विभक्त केले आहे. ही आठ प्रकरणे कर्म नष्ट करून सिद्ध, बुद्ध, मुक्त होण्यासाठी साधकाला उपयुक्त ठरावित अशी भावना आहे. प्रकरण १ : 'जैन संस्कृती धर्म आणि वाङ्मय'
या प्रकरणात मानव जीवन, धर्म, भारतीय संस्कृती वैदिक व श्रमण संस्कृतीच्या दोन धारा, त्यांचे साहित्य, तत्त्वदर्शन, आचार इत्यादींचे विवेचन करून जैन परंपरेचे वर्तमान काळाचे शेवटचे तीर्थंकर श्रमणभगवान महावीरांद्वारा प्ररूपित द्वादशांग आणि तत्संबधित उपांग इत्यादी व प्रकीर्णक आगमाचा थोडक्यात परिचय दिला आहे, जे शोधकार्याच्या पृष्ठभूमीच्या मुख्य अंग रूपात प्रयुक्त झाले आहे.
सर्व प्रथम मानवी जीवनाचे वर्णन केले आहे. कारण मनुष्य ह्या सृष्टीची सर्वोत्तम रचना आहे. या सर्वोत्कृष्टतेचा मूळ आधार आहे त्याची विचारशीलता व विवेकशीलता. प्राण्यांचे वैशिष्टय आहे 'चैतन्य'. प्राण्याच्या सहस्राधिक वर्गात मानवजाती सर्वश्रेष्ठ आहे. सदसद् आणि हिताहिताचा विवेक मनुष्यात आहे. त्याच्याबरोबर अन्य कोणताच प्राणी स्पर्धा करू शकत नाही. प्रेम, करुणा, दया, ममत्व, साहचर्य बंधुत्व, संवेदना, क्षमा इत्यादी असंख्य भावना मनुष्याच्या हृदयातच निवास करतात. अशा भावना अन्य प्राण्यात दिसून येत नाही आणि असल्या तरी त्या एकदम