________________
(१५८)
समान म्हणून ते शरणरूप आहेत. तिसरे,
13
भरणरूप आहेत. तिसरे साधुपद 'शरणरूप' अथवा 'आलंबनरूप' म्हटले द फारच महत्त्वपूर्ण आहे. साधुत्व तथाकथित वेशभूषेमध्ये कर्मकांडमलक
नाही ते तेव्हाच साध्य होते जेव्हा जेव्हा प्राण्यामध्ये परविन्मुखता, ना किंवा स्वन्मुखतेचा भाव जागृत होतो. साधू स्वतः साधक असतातच. परंतु
ते दसन्यांनाही आत्मोपलब्धिच्या दिशेत प्रेरित करतात. म्हणून ते 'स्व-पर विधायक' मानले जातात. सांसारिक दुःखाने, विषमतेने आणि समस्यांनी ग्रासलेला सब साधच्या सान्निध्यात शांतीचा अनुभव करतो. त्याला एक असे आश्रयस्थान मिळते र त्याचा थकवा दूर होऊन त्याला एक मानसिक शांती प्राप्त होते. म्हणून ते वस्तुतः स्पच आहेत.
ह्या तीन शरणांनंतर केवली, सर्वज्ञदेव वीतराग प्रभुंद्वारे प्रतिपादित धर्माचा जो मरणरूपात जो उल्लेख झाला आहे तोसुद्धा महत्त्वपूर्ण आहे. कारण धर्मच असे तत्त्व आहे, पदार्य आहे ज्यांचा आधार घेऊन मनुष्य साधुत्वाचे सन्मानीय जीवन स्वीकारतो त्याची साधना करता करता तो प्रमाद, मोह, लोभ इत्यादींवर विजय मिळवून अर्हत बनतो. ज्याची अंतिम सर्वोत्कृष्ट परिणती मुक्तता किंवा सिद्धत्वाच्या रूपात निष्पन्न होते म्हणून धर्म महान आहे. आदेय आहे, उपादेय आहे, सर्वोत्कृष्ट आहे.
अशाप्रकारे हे चार शरण, शरणरहित प्राण्यांसाठी निसंदेह, शांतीप्रद, श्रेयस्कर आश्रयाच्या रूपात सिद्ध होतात. जसजसे मानव ह्या चतुष्पदींचे चिंतन करतो, शरणस्वरूपात ह्यांना स्वीकारण्याची भावना ठेवतो तसतशी त्याच्यात एक आत्मस्फूर्ती आणि
चेतनेची जागृती होते. तो हे विसरतो की मी शरणरहित आहे, आश्रयरहित आहे. मनामध्ये अशाप्रकारे विश्वास उत्पन्न झाला तर साधनेच्या मार्गावर चालण्यासाठी काय अडचण असणार ? तसे करण्यात त्याला एका अनिर्वचनीय अर्थात शब्दातीत आनंदाची अनुभूती होईल.
ह्याच सूत्रामध्ये एके ठिकाणी शास्त्रकाराने पंचवीस भावनांचा संकेत केला आहे. (१) तेथे त्यांचा आशय महाव्रतांच्या पंचवीस भावनांशी निगडित आहे. त्यासंबंधी पूर्व सटामध्ये प्रसंगानुसार विवेचन केले गेले आहे. विशेषरूपाने आचारांग सूत्रामध्ये जेथे भावनेचे विश्लेषण केले आहे तेथे हा विषय वर्णिलेला आहे.
द्वादश भावनेच्या अतिरिक्त मैत्री इत्यादी चार भावनासुद्धा स्वीकृत आहेत. त्यात या भावनेचे आपले एक विशिष्ट स्थान आहे कारण ह्या जगामध्य कटुता, क