________________
(१५६)
मामध्ये एके ठिकाणी भिक्षूला मूर्छा आणि गृद्धीपासून दूर राहून संयमामध्ये नेहमी
याचा संदेश दिलेला आहे. त्या संदर्भात सांगितले आहे की, भिक्षू अशुचितेने असणाऱ्या, अशाश्वत असणाऱ्या, शरीराचा नेहमीसाठी त्याग करतो. तो व्याच्या बंधनाला तोडून जेथून पुन्हा परत यावे लागत नाही अशा सिद्ध स्थानाला
प्राप्त करतो.९९
ह्या गाथेमध्ये सूत्रकाराने देहाची आसक्ती सोडण्यासाठी देहाची अशुचिता अथवा अशचितून उत्पन्न, अशाश्वत, अनित्य अशा घृणास्पद शरीराची आसक्ती धरणे कितपत योग्य आहे ? हे भाव व्यक्त केलेले आहेत. 'अशुची'शब्द वाचताच मनामध्ये हे भाव आंदोलित होऊ लागतात की हा शब्द बारा भावनेच्या अंतर्गत असलेल्या अशुची भावनेकडे संकेत करीत आहे. सूत्रकाराने ह्या शब्दाचा येथे विशेषत्वाने उल्लेख केला आहे. ज्याचा भावार्थ असा आहे की हा जीवात्मा घृणास्पद मलमूत्रयुक्त देहामध्ये का आसक्त होत आहे ? ह्या गाथेत 'अशुची' भावनेचे स्पष्ट चित्रण झालेले आहे.
आगमांवर रचलेल्या व्याख्यासाहित्यामध्ये चूर्णीचे अत्यंत महत्त्व आहे. आगमामध्ये प्रतिपादित तथ्याचे चूर्णीमध्ये विश्लेषण आहे.
जीवनाच्या अनित्यतेचा चूर्णीमध्ये ठिकठिकाणी उल्लेख झाला आहे. दशैकालिक चूर्णीमध्ये सांगितले आहे की, मनुष्यजीवन निश्चितच अनित्य आहे. ते गवताच्या टोकावर पडलेल्या जलबिंदूप्रमाणे चंचल आहे. कारण ते थेंब केव्हा नष्ट होतील ते सांगता येत
नाही.१००
__ जीवनाच्या क्षणिकतेचे सुंदर, सजीव चित्रण करूण चूर्णीकारांनी मनुष्यजातीला धर्मकर्म करण्यासाठी जागृत होणयाचा दिव्य संदेश दिला आहे.
निर्जरेचे वर्णन करताना शास्त्रकारांनी लिहिले आहे की, स काम निर्जरचे फळ अत्यंत महान आहे. करोडो वर्षांपर्यंत केलेल्या अकाम निर्जरेपेक्षा एका घडीची सकाम निर्जरा अधिक फलदायी आहे हे भगवान महावीरांचे कथन आहे. अकाम निर्जरा आविवेकपूर्वक केलेली गती आहे व सकाम निर्जरा विवेकपूर्वकची गती आहे. म्हणून काणतीही क्रिया तप कसे करावे त्याच्यासाठी सांगितले आहे की -
नो इह लोगट्ट्याए तवमहिट्ठिज्जा, न परलोगट्ट्याए तवमहिट्ठिज्जा नो कित्ति वण्ण सद्द - सिलोगट्ट्याए तवमहिट्ठिज्जा
ननत्थ निजरठ्याए तवमहिट्ठिज्जा ।१०१