________________
2015ADAR
रूप नेहमी आपले मन धर्मात लावतो, धर्माचे मनामध्ये चिंतन, अनुचिंतन हो तो इतक्या उच्च पातळीवर जातो की देवतासुद्धा त्याला नमस्कार करतात.९५
मागाथेमध्ये धर्माचे महत्त्व दाखवून त्याच्या सतत चिंतन, मननाच्या दिशेने के संकेत केला आहे तो धर्मभावनेच्या रूपात दृष्टिगत होतो. धर्माचे उत्कृष्ट, परमोत्तम प्रगत स्वल्प सांगून सूत्रकाराने जनमानसाला त्याकडे प्रवृत्त करण्याचा जो उपक्रम केला आहे तो सर्वथा स्तुत्य आहे. थोडक्यात धर्माचे स्वरूप हिंसा त्याग, संयमी जीवन आणि नयस्येशी संलग्न आहे असे स्पष्ट केले आहे. ह्या गाथेचा चौथा चरण अत्यंत मार्मिक आहे. जो सदैव मनामध्ये धर्मभावनेचे चिंतन, मनन करतो त्याच्या जीवनात असे परिवर्तन होते की त्याचे सर्व विकार नष्ट होतात आणि त्याच्यावर सुसंस्कार होतात. तो केवळ मानव समुहाद्वारेच नव्हे तर देवगणांसाठीही वंदनीय, पूजनीय, सन्माननीय बनतो. सांगण्याचे तात्पर्य हे आहे की, सूत्रकाराने धर्माचे लक्षण सांगून ह्यात अत्यंत कमी शब्दांमध्ये धर्मभावनेने प्रेरित करण्याचा खूप सुंदर प्रयत्न केला आहे.
या आगमात एक प्रसंग असा आहे की जेथे हे दाखवले आहे की मुनींनी महान आचार्याच्या वचनाला 'अमोघ' म्हणजे सार्थक करावे. म्हणजे त्यांच्या वचनानुसार कार्य करून त्याला सफळ करावे.९६ मुनींच्या हृदयामध्ये ह्या भावनेला दृढ करण्यासाठी आचार्यानी जीवनाची नश्वरता आणि अनिश्चिततेकडे साधकाचे लक्ष वेधून घेऊन सांगितले आहे की जो साधक मोक्षपथावर गतीशील आहे तो विचार करतो की हे जीवन अस्थिर, अध्रुव आहे. आयुष्य सिमित आहे. त्याला एक निश्चित काळानंतर ह्या जगाचा त्याग करून जावे लागणार आहे. म्हणून त्याने जीवनाच्या परमसिद्धीच्या मार्गाचे ज्ञान करून स्वतःला विषयवासनेपासून दूर ठेवावे.९७
शरीराच्या अनित्यतेवर प्रकाश टाकताना सूत्रकार पुन्हा सांगतात की, जोपर्यंत व्याधीरोगाची वृद्धी होत नाही, जोपर्यंत इंद्रियांची शक्ती क्षीण होत नाही तोपर्यंत प्राण्याने धर्माचे चांगल्या प्रकारे पालन केले पाहिजे.९८
उपरोक्त दोन गाथांमध्ये आचार्यांनी सांसारिक जीवन, यौवन, स्वस्थता आणि प्रायबलाची अध्रुवता, अस्थिरता किंवा नश्वरतेकडे संकेत केला आहे. ह्या भावनेने MONR समजून येते की ज्याला शाश्वत समजन तो उन्मत्त होतो. ते सर्व काही नष्ट
होणारे आहे.
बारा भावनांतील 'अनित्य' नामक भावनेची परिभाषा यामध्ये येते. ह्या