________________
(१५०)
ता नव्हता. म्हणून मला ह्या जीवनातच त्राण दिसला.' राजा म्हणाला, 'मुनिवर, मी नाथ बनतो. हे कष्टमय जीवन सोडा आणि माझ्या छत्रछायेखाली सांसारिक सुखाचा 'यभोग घ्या.' मुनी म्हणाले, 'हे राजन, थोडा विचार करा. अरे, तुम्ही स्वतः अनाथ आहात. अच्छा माझे नाथ कसे होणार ?' राजा आश्चर्याने पाहतच राहिले. तेव्हा मुनी म्हणाले, 'हे राजा, काय तुम्हाला कोणी व्याधी, वृद्धत्व अथवा मृत्यूपासून वाचविण्यास समर्थ आहे? 'राजा, 'अनाथ-सनाथ' याचा अर्थ समजून घे.' मुनींच्या सांगऱ्याचा आशय हा होता की
संसारामध्ये जो केवल धर्माचा आश्रय घेतो तोच केवल सनाथ आहे. अन्य सर्वजण अनाथ आहेत. मुनींचे हे वचन ऐकून राजा त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. ह्या कथेमध्ये (अशरण भावनेचे विवेचन झाले आहे. ७७ जरा आणि मृत्यूच्या महाप्रवाहामध्ये बुडणाऱ्या प्राण्यांसाठी धर्मच द्वीपाचे कार्य करतो. तोच प्रतिष्ठान आहे, आधार आहे, उत्तम गती आणि शरण आहे. ७८
जो तपरूपी धर्माचरण करतो, त्याच्या सहस्रावधी जन्मांच्या संचित कर्माची निर्ज होते. ७९
ह्या गाथेमध्ये तपाद्वारे निर्जरेचा स्पष्ट उल्लेख आहे. निर्जरा भावना सर्वात महत्त्वपूर्ण आहे, जी मनुष्याला मोक्षाप्रत नेते.
संवर भावनेचे वर्णन करतान लिहिले आहे की, नाळे बंद केले असता पापाचा प्रवाह थांबतो, त्याचप्रमाणे समभावाच्या साधनेने सावद्ययोग अर्थात पापकारी कार्याची मिरती होते, त्याग होतो, प्राणिवध, मृषावाद, अदत्तग्रहण, मैथुन, परिग्रह व रात्रीभोजनत्याग केल्याने जीव अनास्रव होतो म्हणजे संवृत होतो. पाच समिती, तीन गुप्तींच्या आचरणाने ६ अकषाय, जितेन्द्रिय, गर्वरहित आणि निशल्य झाल्यानेसुद्धा जीव अनास्रव होतो. ८०
तसेच तलावात भरलेल्या पाण्याला उपसून बाहेर टाकल्याने जसा तलाव सुकून जातो त्याचप्रमाणे पूर्व संचित करोडो भवाच्या कर्माची तपस्येद्वारा निर्जरा केल्याने आत्मा मुक्त होतो. ८१
कर्म
मन, वाणी आणि शरीराच्या संवराला योग म्हटले आहे. ८२
उपरोक्त गाथेमध्ये आस्रव रोखण्याचे उपाय म्हणजे जीवाने संवराची आराधना कशाप्रकारे करावी आणि पूर्वी आलेल्या कर्मांची निर्जरा कशी करावी ह्याच्यासाठी सुंदर उदाहरण देऊन विवेचन केले आहे. जेव्हा ह्या सर्व क्रिया जीवात्मा करतो त्या धर्मक्रियेला योग म्हटले आहे. आस्रव संवर आणि निर्जरा ही तीन तत्त्वे आहेत आणि भावनाही