________________
(१४९)
अतीकडे नेते. अन्यथा हे संपूर्ण जग आणि ह्या जगाची सर्व संपत्ती जरी स्वतःची झाली ती जीवाला अपर्याप्त वाटू लागेल आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी ती उपयोगी पडत
ह्या चौदाव्या अध्ययनामध्ये सांसारिक सुखाची क्षणिकता, अशरणता इत्यादींचे बर्णन करून धर्माच्या सार्थकतेचे सुंदर विवेचन केलेले आहे. एक धर्मच ध्रुव, नित्य व
त आहे ७३
अठराव्या अध्ययनामध्ये संयति राजाला गर्दभालमुनी म्हणतात की, 'अणिच्चे जीव लौगम्मि किं रज्जम्मि पसिज्जसि ७४ हे राजन! ह्या जगात जीवन अनित्य आहे, क्षरभंगूर आहे, तू ह्या राज्यामध्ये का आसक्ती धरत आहेस ? कारण जीवन आणि रूप वीजेच्या चमकण्याप्रमाणे चंचल आहे.
ह्या आगमाच्या एकोणिसाव्या अध्ययनामध्ये 'मृगापुत्र' संसाराच्या चतुर्गतीमध्ये भ्रमण करता करता कसे दुःख भोगावे लागले त्याचे विवरण स्वतःच्या आईवडिलांना सांगत आहे आणि वैराग्यप्रधान विचार व्यक्त करताना सांगतो की, हे शरीर अनित्य आहे, अपवित्र आहे. अशुचिमय पदार्थापासूनच उत्पन्न झालेले आहे. इथला आवास अशाश्वत आहे. दुःख आणि क्लेशाचे घर आहे, हे शरीर पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे क्षणिक आहे. ह्याला कधी ना कधी तरी सोडावेच लागणार आहे. म्हणून अशाप्रकारे अशाश्वत शरीरामध्ये मला आनंद मिळत नाही. मृगापुत्र संसाराची असारता स्पष्ट करण्यासाठी पुढे सांगतो की, ह्या जीवनात जन्म, जरा, रोग, मरण हे सर्व दुःखरूपी आहेत. हा संसारसुद्धा दुःखरूपी आहे, ज्यामध्ये प्राणी दुःख आणि क्लेशच प्राप्त करतात. अशाप्रकारे शरीराची अनित्यता, अशुचिता व संसाराच्या विचित्रतेचे अत्यंत सुंदर चित्रण ह्या अध्ययनामध्ये केले आहे. ७५ आणि पुढे सांगितले आहे की, जो मनुष्य धर्माचरण केल्याशिवाय परभबामध्ये प्रवेश करतो तो व्याधी आणि रोगाने पीडित आणि दुःखी होतो. त्या अधर्मीला अनेक अप्रिय संयोग होतात आणि अनेक प्रिय गोष्टींच्या वियोगाचे दुःख भोगावे लागते.७६
उत्तराध्ययनाच्या विसाव्या अध्ययनामध्ये 'अनाथी मुनीं'ची कथा आहे. ते मुनी ध्यानस्थ असताना योगायोगाने राजगृही नरेश श्रेणिकमहाराज तेथून निघाले. ते मुनींच्या तेजस्वी आणि मोहक व्यक्तिमत्त्वाने अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांना विचारले, 'हे मुनिराज, अशा भर यौवनामध्ये आपण हे त्यागमय जीवन का स्वीकारले ? हे वय तर सुख भोगण्याचे आहे.' मुनी म्हणाले, 'राजन, मी अनाथ होतो. माझा कोणीच
सांसारिक