________________
(११४)
करणे म्हहाजे प्रमोद भावना होय.७४
ा जगात अनेक प्राणी निवास करतात. पदप्रतिष्ठेमध्ये कोणी लहान आहे तर मोठे. कोणी गुणी आहेत तर कोणी अवगुणी. पंडित-मूर्ख, संपन्न-विपन्न, सरळमानी-अज्ञानी, स्वार्थी-परमार्थी इत्यादी अनेक प्रकारची विविधता मानव समाजामध्ये समान आहे. ज्यांना गुणी बनायचे आहे त्याने दुसऱ्याची हीनता पाहून स्वतःला श्रेष्ठ मानने योग्य नव्हे आणि दुसऱ्यांची उन्नती पाहून त्याची ईर्षा करीत राहणे हे सुद्धा योग्य माही म्हणूनच प्रसिद्ध प्रार्थना 'मेरी भावना' यामध्ये सांगितले आहे -
- "गुणी जनों को देख हृदय में मेरे प्रेम उमड आवे'' गणी, ज्ञानी, ध्यानी, दानी, तपस्वी, योगी इत्यादींना आदर देणे त्यांचा सत्कार, सन्मान करणे ही ह्या भावनेची फलश्रुती आहे. जेथे गुणीजनांच्या प्रती आदर नाही, प्रमोदभाव नाही तेथे धर्माचा नामनिर्देशसुद्धा नाही असे समजावे. उपाध्यायविनयविजय यांनी 'शांतसुधारस' काव्यात लिहिले आहे -
'भवेत् प्रमोदो गुणपक्षपातः'७५ गुणांच्या प्रती प्रमोदभाव ठेवणे, अनुराग ठेवणे म्हणजे प्रमोदभावना आहे. गुणवान कोणत्याही जातीचा, कुळाचा अथवा धर्माचा असो, कोणत्याही लिंगाचा असो आणि कोणत्याही वयाचा असो त्याच्या गुणांबद्दल प्रमोदभाव, पूज्यभाव असलाच पाहिजे. मानवी स्वभावाचे जर सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण केले तर स्पष्टपणे समजेल की, मनुष्याला स्वतःच्या लहानश्या गोष्टींची मोठी अनुभूती होते आणि दुसऱ्यांच्या मोठ्या कार्याचे काहीसुद्धा वाटत नाही, उलट ते त्याला लहानच भासते. जो निर्गुणी असतो तो दुसऱ्यांचे गुण पाहत नाही, ज्या बाबतीत प्रसन्न व्हावयास पाहिजे तेथे तो खिन्नतेचा अनुभव करतो अशा व्यक्ती वस्तुतः गुणग्राहक नसतात. त्या वेळ बघून गुणीजनांचाही अपमान करतात, त्यांच्यातील उणीवा शोधतात, दोषदर्शन करतात.
काही व्यक्ती अशा असतात की त्या एखाद्या व्यक्तीमध्ये गुण नसतानाही त्याचा मोठेपणा दाखवितात. परंतु ही प्रमोदभावना सुद्धा गुणग्राहक दृष्टीची द्योतक नाही. तर चाटुकारिता आहे. स्वत:चा स्वार्थ साधणे हाच त्यांचा उद्देश असतो.
___इषो दूर करण्यासाठी प्रमोद भावनेचे चिंतन अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना गुणवान बनायचे आहे त्यांचे पहिले कर्तव्य हे आहे की गुण आणि गुणींची प्रशंसा करणे. गुणीजनांच्या गुणांची प्रशंसा केल्याने कोणत्याच प्रकारचे नुकसान होत नाही. गुणी सुद्धा