________________
(११५)
स्वत:च्या प्रशंसेमुळे आपल्या गुणांमध्ये दृढ होतो आणि गुणांची वृद्धी करतो आणि ते दुसऱ्याच्या गुण वृद्धीचे कारण होते. अशाप्रकारे प्रमोद भावनेने स्व पर उपकार साध्य
शोतो.
हा संसार फुले आणि काटे यांचे संग्रहालय आहे, मानवाने भुंग्याप्रमाणे काट्यांची चिंता न करता केवळ गुणग्राही बनले पाहिजे. प्रमोद भावनेच्या चिंतनाने मनुष्य गुणग्राही बनतो, त्याचे आर्तध्यान, रौद्रध्यान सुटते. ईर्षा, द्वेष वृत्ती सुटते आणि गुणीजनांची कृपादृष्टी
सहज प्राप्त होते.
आत्मविकास आणि सदगुणांच्या संग्रहासाठी प्रमोद भावनेचे चिंतन अवश्य करावे. श्रावकाच्या एकबीस गुणांमध्ये एक गुण 'गुणानुरागी' असल्याने श्रावकासाठी सुद्धा गुणीजनांप्रती प्रमोदभाव ठेवणे आवश्यक आहे. ह्याच्याने कर्म निर्जरा होते आणि उत्कृष्ट गुणांची प्राप्ती होते. “तीर्थंकर गोत्र उपार्जनाच्या वीस बोलांच्या सुरुवातीचे बोल परमेष्टी व ज्ञानी, ध्यानी, तपस्वीचे प्रमोदभावाने गुण कीर्तनाचे आहेत. ''७६
हे मनोवैज्ञानिक सत्य आहे की जो जसे चिंतन करतो कालांतराने तो तसाच बनतो. म्हणून प्रत्येक मोक्षार्थीने प्रमोद भावनेचे स्वरूप समजून गुणीजनांच्याप्रती यथायोग्य प्रमोदभाव ठेवला पाहिजे.
करुणा भावना
करुणा भावनेचे स्थान जगातील प्रत्येक प्राण्यासाठी आणि विशेषतः दीन, हीन, दुःखित, पीडित, दरिद्र लोकांच्यासाठी दया अथवा अनुकंपा यांच्या रूपात राहते. “अनुकूलं कंपनं अनुकम्पा" जेव्हा कोणत्याही दुःखी, पीडित जीवाला बघून मनामध्ये अनुकूल कंपन अथवा त्याची अनुभूती येऊन त्याचे दुःख दूर करण्याचा जो उपक्रम केला जातो त अनुकंपा आहे. दुःखी लोकांचे दुःख दूर करणे म्हणजे दया आहे आणि दया धर्माचे मूळ आहे, पाया आहे.
जीवाला शारीरिक, मानसिक इत्यादी असह्य दु:खराशी उद्विग्न करतात. ह्या दुःखाचे मुख्य कारण मिथ्यात्व, प्रमाद, कषाय आणि अशुभयोगाने केलेले कर्म आहे ते कर्म उदयास आल्याने दुःखे भोगावी लागतात. अशा दुःखी लोकांना बघून दुःखी होणे आणि लवकरात लवकर त्या दुःखातून त्यांची मुक्तता व्हावी असा विचार करणे, अशा प्रकारच्या करुण भावनेने द्रवित होणे ही करुणाभावना आहे, अनुकंपा आहे.७७
ज्यांच्या हृदयात करुणा आहे, त्यांना दुसऱ्या दुःखी मनुष्यांना विचारण्याची जरूरी