________________
(११३)
भांडणे मिटतात आणि सर्वत्र सुख, शांती, आनंद प्रस्थापित होतो. मैत्री भावनेने
आणि दसऱ्यांच्या जीवनात अभयाचा संचार होतो. 'आत्मवत् सर्वभूतेषु' ही
भावना दृढ बनते. अहंकार नष्ट होतो.
तीर्थकर भगवंतांचा जीवसुद्धा पूर्वीच्या तिसऱ्या भवामध्ये अशी अनुपम भावना देखतो की, "सवी जीव करू शासन रसी'' सर्व जीव धर्ममार्गामध्ये लागावेत, सर्व जीवांना मती मिळावी, संसाराची अधिव्याधी आणि उपाधी दूर करण्याचा मार्ग जो त्यांना मिळाला आहे तो सर्व जीवांना मिळावा अशाप्रकारे प्राणी मात्रांच्या उत्थानासाठी हितासाठी, मैत्री ठेवणे हीच मैत्री भावना आहे.
ह्या मैत्री भावनेने अहिंसा धर्माची स्थापना होते. जगातल्या सर्व जीवांचे राग, सनष्ट व्हावे अशी शुभ भावना मैत्री भावनेने प्रकट होते. जो सतत मैत्री भावनेचे चिंतन करतो त्याच्या चित्तामध्ये शुभभाव उत्पन्न होतात आणि शुभभावरूपी जळाने आत्म्याचा देवानी शांत होतो.
मैत्री भावना सम्यक्त्वांचा आधार आहे. कारण अमैत्री भावना असणाऱ्या जीवामध्ये अनंतानुबंधी कषायाचा सद्भाव राहतो.
मैत्री भावनेशिवाय मोक्षाची प्राप्ती संभवत नाही कारण एका जीवाबद्दल सुद्धा जर वैरभाव राहिला असेल तर मुक्ती संभवत नाही.
धार्मिक अनुष्ठान, सामायिक, प्रतिक्रमण, तप, जप, पूजा, पाठ इत्यादींबरोबर सुद्धा मैत्री भावनेचा संयोग आवश्यक आहे. अन्यथा अशा धार्मिक क्रियेमध्ये पुण्यार्जन होते परंतु आत्मधर्माची आराधना होऊ शकत नाही.
संसारामध्ये सुख, शांती, आनंद आणि प्रेमाचे साम्राज्य स्थापन करण्यासाठी मत्रा भावना अत्यंत आवश्यक आहे. वाढत्या सुख-सुविधा आणि भौतिक उन्नतीच्या प्रतिस्पर्धेने एकमेकांत ईर्षा, द्वेष, वैर, निंदा, मात्सर्य, स्वार्थीपणा इत्यादी दोषही वाढत आहेत. त्यांना नष्ट करण्यासाठी मैत्री भावनेचे चिंतन हाच सर्वश्रेष्ठ उपाय आहे. चिंतनाने सपूर्ण विश्वामध्ये सुख शांती आणि आनंदाचा स्रोत वाहू शकतो. प्रमोदभावना
सदगुणांची आराधना प्रमोदभावनेचा मूळ मंत्र आहे. गुणीजनांच्या गुणांचा विचार करण, त्यांच्या गुणवत्तेने प्रसन्न होणे, त्यांचे गुणगान करणे, मुख आणि नेत्राने हर्ष अथवा
ता प्रकट करणे, आपल्या हृदयात गुणी लोकांबद्दल भक्ती प्रकट करणे, अनुराग व्यक्त