________________
(११०)
दुर्गतौ पततन् जन्तोः धारणाद् धर्म उच्यते । धत्ते चैतान् शुभे स्थाने, तस्माद् धर्म इति स्मृतः ॥
जो दुर्गतीमध्ये पडत्या जीवांना धारण करतो, अडवितो त्याला धर्म म्हणतात. आत्म्याला मुक्त करून शाश्वत स्थानी पोहचवणारा धर्मच आहे.
धर्म आत्मिक आणि लौकिक दोन्ही प्रकारचा आहे. ज्या आराधना केल्याने जीव आत्माभिमुख होतो अशा संबर, सामायिक, पौषध, त्याग, तप, उपबास इत्यादी आराधना म्हणजे आत्मिक धर्म आहे. आणि लोक, सामाजिक, सदाचार, नीती, प्रामाणिकता इत्यादी लौकिक धर्म आहेत.
जो आत्मधर्म साधूसाठी आहे त्याला 'अणगार धर्म' म्हणतात. जो धर्म श्रावकउपासकासाठी आहे त्याला 'आगार धर्म' म्हणतात. सर्व तीर्थंकरांनी धर्माचे सारखेच निरूपण केले आहे. कोणत्याही जीवाला मारू नका. अहिंसा, संयम आणि तपरूपी साधनाच जीवनासाठी कल्याणकारी आहे. सर्व जीवांना जगण्याची इच्छा आहे. कोणालाही मरण्याची इच्छा नाही. त्यांची दया करणे हा धर्म आहे म्हणूनच म्हणतात, "दया धर्म का मूल है।"
जैन ग्रंथांतील एक प्रसिद्ध उदाहरण आहे. तपस्वी धर्मघोष मुनींचे शिष्य धर्मरूची यांना नागश्री नावाच्या ब्राह्मण स्त्रीने कडू भोपळ्याची भाजी भिक्षेत दिली, त्याच्या वासानेही
जीवजंतू मृत्युमुखी पडतात. तेव्हा मुनींनी विचार केला की भाजीचा एक थेंब जमिनीवर
7
टाकला तर अनेक जीव मरतात, जर ही संपूर्ण भाजी भूमिवर टाकली तर किती जीव मरतील. माझा धर्म जीवांची रक्षा करणे आहे. अशाप्रकारे धर्मभावनेने हृदय द्रवित करून कडू तुंबड्याच्या भाजीचा आहार केला आणि विषाच्या प्रभावाने मृत्यू निश्चित होईलच हे समजून शेवटी समाधीपूर्वक ‘संथारा' व्रत करून आयुष्य पूर्ण करून सर्वार्थसिद्ध विमानामध्ये उत्पन्न झाले. हे धर्मभावनेचे अपूर्व उदाहरण आहे. त्याच्यामध्ये अहिंसा धर्माचा परम विजय आहे.
वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या आचार्यांनी जसे हरीभद्र हेमचंद्र, शुभचंद्र इत्यादी विद्वान आचार्यांनी धर्माचे जे सुंदर प्रेरणादायी विवेचन केले आहे त्याचे साधकाने आपल्या मनात सतत चिंतन करीत राहिले पाहिजे. त्यामुळे त्याचे धर्माच्या प्रती आकर्षण बाटेल. धर्मसिद्धातांप्रती जिज्ञासा उत्पन्न होईल आणि जेव्हा मानबात खरी जिज्ञासा जागृत होते तेव्हा तो त्या संदर्भात शोध करतो. मनाची पृष्ठभूमी पवित्र असेल तर तो तसा