________________
ही करतो. म्हणूनच धर्मभावनेचे दररोज चिंतन केले पाहिजे. त्याने मनामध्ये ती ढता निर्माण होते. मानव धार्मिक जीवन जगण्यासाठी तत्पर होतो.
बारा भावनांचे येथे थोडक्यात विवेचन केलेले आहे. ते केवळ संकेतमात्र आहे. विषय तर इतका महत्त्वपूर्ण आणि विस्तृत आहे की ह्याच्या एकेका भावनेवर एकेक मोबांध होऊ शकेल. येथे हे समजण्यासारखे आहे की ह्या बारा भावनांच्या केंद्रस्थानी जमा आहे. आत्म्याबरोबर जुळलेले विविध चिंतन पक्ष ह्यात स्पष्ट होतात. जेथे आत्म्याचे सनाच्या दृष्टीने भावनात्मक चिंतन आहे तेथे एकत्वभावना निर्माण होते. जेथे आत्म्यापेक्षा अन्य'च्या वास्तविक स्वरूपाचे दिग्दर्शन आहे त्याच्याद्वारे आत्माभिमूखता प्राप्त करण्याची प्रेरणा मिळते ती अन्यत्वभावना आहे. त्याचप्रमाणे उपरोक्त अन्य सर्व भावना आत्मारुपी कंदाच्या परिधीमध्येच फिरत राहतात. मैत्री इत्यादी चार भावना : एक परिचय
अनित्यादी बारा भावनांबरोबर चार भावनांचे वर्णन अनेक आचार्यांनी केलेले आहे. ह्या चार भावना साधकाच्या जीवनाला सरळ, सौम्य, करुणाशील बनविण्यासाठी सहायक आहेत. वाचक उमास्वाती यांनी मैत्री, प्रमोद, कारुण्य आणि माध्यस्य६६ ह्या चार भावनांच्या नावाचा संकेत केला आहे. ह्या भावना चित्ताला धर्मध्यानामध्ये स्थिर करतात. "धर्मध्यानाला पुष्ट करण्यासाठी भावना हे रसायन आहे.६७ जसे औषधी रसायनाने शरीराचे रोग नष्ट होतात तसेच ह्या चार भावना भवरोग मिटवून आत्म्याला पुष्ट करतात. पातंजल योगसूत्रामध्ये सांगितले आहे की ह्या भावनेच्या आधारावर सुख-दुःख, पाप- पुण्य इत्यादी विषयांचे चिंतन केल्याने चित्तामध्ये प्रसन्नता आणि आल्हादाची अनुभूती
..
हरीभद्रसूरी यांनी 'योगशतका'मध्ये सांगितले आहे की सर्व प्राण्यांप्रती मैत्री भाव गुणाधिकांच्या प्रती अर्थात गुणांची ज्यामध्ये विशिष्टता आहे, जे पुरुष सद्गुणी आहेत त्यांच्याप्रती प्रमोदभाव, दुःखी जीवांच्या प्रती करुणाभाव, आणि जे उर्मट, उद्धट अथवा आवनीत आहेत त्यांच्याप्रती उदासीन भाव ठेवला पाहिजे.६९
ॐ ह्या भावनेचे चिंतन मनुष्याला माणुसकीच्या श्रेष्ठतम शिखरावर पोहचविते. आज जनजीवनामध्ये द्वेष, ईर्ष्या, संघर्ष आणि कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ह्या चार भावनांच्या चिंतनाने ह्या दोषांचे आपोआप निर्मुलन होते. म्हणून आध्यात्मिकतेबरोबर मानवीय शांतीसाठी ह्या भावनेचे चिंतन आवश्यक आहे.
Model