________________
(१०९)
आहे त्याचा आशय मानवाला 'असत्' पासून दूर करून 'सत्'मध्ये लावणे आहे. मानवाने आपल्या सत्य स्वरूपाला समजून असा अनुभव करायला पाहिजे की तो स्वतः एकमात्र स्वतःचे हित करू शकतो. दसरे जितके सांसारिक लोक त्याचा हितचिंतक असल्याचे बोग करतात ते सर्व मिथ्या आहे - खोटे आहे. त्याला कर्मप्रवाहरूपी आनवाने स्वतःला वेगळे करून संवर आणि निर्जरेची साधना केली पाहिजे, ज्याने ह्या अनादी, अनंत संसारात तो आबागमनातून मुक्त होईल. ह्या अकरा भावनांच्या अभ्यासाने भावित होऊन मनुष्य धर्मभावनेच्या भूमिकेवर येतो. कारण धर्म असे साधन आहे की ज्यामुळे 'पर' भाव सोडून मनुष्य 'स्व' भावात येतो.
विभिन्न आचार्यांनी धर्माच्या अनेक प्रकारे व्याख्या केलेल्या आहेत. "धारणात् धर्मः इत्याह धर्मात् धारयते प्रजा ६३ मनुस्मृतीचे हे कथन अत्यंत मार्मिक आहे. धर्म शब्द 'धृञ्' धातूपासून बनला आहे. त्यामुळे तो संसाराला धारण करतो, संसार त्याच्या बळावर टिकून राहिला आहे. म्हणूनच त्याला 'धर्म' म्हणतात. धर्माच्या नियमिततेमुळे तो सत्य, शील, विश्वास आणि सद्भावावर टिकून आहे. सांसारिक सर्व कार्ये त्याच्याद्वारे चालतात. “जो धर्माचे पालन करतो, त्याचे रक्षण करतो, धर्म त्यांचे रक्षण करतो. "६२ हे मनूचे प्रसिद्ध वाक्य आहे. अर्थात धार्मिक व्यक्तींचे जीवन सुरक्षित आहे. त्याला कधी भय, धोका राहत नाही. धर्म आत्मशुद्धी, आत्मपरिमार्जन अथवा अंतः परिष्कारावर टिकून आहे. आत्मशुद्धीचे साधन धर्म आहे. धर्माच्या ज्या परिभाषा केल्या आहेत त्या ह्याच्याच आधाराने केलेल्या आहेत. त्या संवर निर्जरामूलक आहेत. कारण की आस्रव निरोध आणि तपश्चर्येने आत्मशुद्धी होते.
आचार्य कुंदकुंद यांनी आत्मस्वभावाला 'धर्म' म्हटले आहे. ६५ धर्मभावनेमध्ये धर्माच्या स्वरूपाचे, धर्माच्या माहात्म्याचे आणि धर्माने होणाऱ्या फायद्याचे चिंतन केले पाहिजे.
घ
‘वत्थुसहंबो धम्मो’ वस्तूचा स्वभाव धर्म आहे. 'धर्म' शब्दाचा पर्यायवाची शब्द 'स्वभाव' होऊ शकतो. बस्तूची प्रकृती म्हणजे स्वभाव आपण त्याला वस्तूचा गुणधर्मही म्हणू शकतो. ज्याप्रमाणे हवेचा गुणधर्म संचरणाचा आहे, पाण्याचा गुणधर्म प्रवाहित राहण्याचा आहे, अग्नीचा उष्णता देण्याचा आहे तसाच आत्म्याचा धर्म " चैतन्य” आहे. ह्या चैतन्यतेने सजीव आणि निर्जीव असे दोन भेद होतात. स्वभाव व्यक्तीला अथवा वस्तूला कधीच सोडत नाही. धर्माचा संबंध बाह्य जगाबरोबर नाही हा तर आत्म्याचा गुणधर्म आहे. एक श्लोक प्रसिद्ध आहे