________________
(१०६)
ह्या लोकामध्ये कोठे तर स्वर्गशिखरयुक्त मेरू पर्वत आहे आणि कोठे भयंकर जाते तर काही ठिकाणी देवाची रत्नखचित मंदिरे आहेत, काही ठिकाणी अंधकारमय नरक इत्यादी अत्यंत भयंकर स्थळे आहेत. कोठे जयजयकार आहे तर कोठे हाहाकार ५० परंतु ज्यांना एकांतसुख प्राप्त करायचे आहे त्याने चिंतन केले पाहिजे की हा संपूर्ण लोक आपल्या आत्म्यासारखा दुसऱ्या जीवात्म्याने भरलेला आहे. हा जीव कर्मानुसार चतुर्गतीमध्ये भ्रमण करतो. आत्मस्वरूपाचे ज्ञान नसल्याने ह्या अनंत यात्रेचा अजून अंत आलेला नाही.
लोकस्वरूपाचे ध्यान करणारा साधक असे चिंतन करतो की हा लोक असे स्थान आहे जेथे अनादी काळापासून सर्व प्राणी भ्रमण करतात. ज्यांनी आपल्या स्वरूपाला ओळखलेले नाही तो इतक्या विशाल लोकामध्ये भटकतो. ह्या जीवाचे अस्तित्व किती लहान आहे. त्याने चिंतन केले पाहिजे की इतक्या मोठ्या लोकात माझे स्थान काय आहे ?
तो आपल्या चिंतनामध्ये अजून पुढे जातो आणि विचार करतो की जोपर्यंत हा जीवात्मा कर्मबंधनातून सुटणार नाही तोपर्यंत ह्या लोकामध्ये भटकत राहील. विभिन्न योनीत संसरण चालू राहते. भीषण नरकाच्या दुःखाविषयी केवळ ऐकल्यानेही कंप सुटतो, भयाच्यामुळे रोमारोमामध्ये स्पंदन होते ते सहन करावे लागते. संसारामध्ये प्रियातीप्रिय व्यक्तीचा वियोग सहन करावा लागेल. दुःखद भयंकर परिस्थितींना तोंड द्यावे लागेल. ह्या लोकामध्ये अनादी काळापासून असे चालत आहे. स्वर्गसुख बाहेरून अत्यंत मोहक वाटते परंतु ते सुद्धा एक ना एक दिवस नष्ट होते. बाहेरून दिसणाऱ्या सुखाबरोबर भयंकर दुःख जोडलेले आहे. भोगाच्या बरोबर अशी परंपरा संलग्न आहे.
1.
जर थोडक्यात सांगायचे असेल तर लोक आत्म्यासाठी भयंकर दुःखाचे घर आहे. ह्याच्यातून सुटल्यानेच आत्मकल्याण होईल. परंतु जोपर्यंत ममत्व आणि अज्ञानाच्या जाळ्यात जीवात्मा अडकला आहे तोपर्यंत मुक्त होऊ शकणार नाही.
ह्या लोकभावनेचे पुन्हा पुन्हा चिंतन केल्याने मनामध्ये लोकासंबंधी लौकिक भाव आणि सुखाच्या प्रती विरक्ती उत्पन्न होते. आत्मा खऱ्या सुखाच्या शोधात अथवा आध्यात्मिक आनंदाकडे उद्युक्त होतो, ती जीवनाची खरी दिशा आहे. बोधीदुर्लभ भावना
मनुष्य संसारात भटकत राहतो. सांसारिक सुखामध्ये तो इतका वेडा झाला आहे की हे सर्व काही सोडून जावे लागेल असे कळत असतानाही तो पौदगलिक सुखामध्ये तीन असतो. असे का ?