________________
RRENTER HAL
RSS
(१०७)
गावर खोलवर विचार केला तर असे प्रतीत होईल की त्याला सत्याचा,
वस्तुस्थितीचा बोध नाही.
मनुष्य जन्म अत्यंत पुण्याने प्राप्त होतो. एक मानवच कर्मयोगी आहे. देव केवळ भोगतात. नरक योनीतील जीव दुःख सहन करतात, तीर्यंच सुद्धा अनेक प्रकारचे र भोगतात. एकमात्र मनुष्य योनीच अशी आहे की जेथे सुख दुःख सहन करता करता साधना, आराधनाद्वारे अनादी काळापासून चालणाऱ्या संसारभ्रमणाचा अंत होऊ शकतो. पर्यन केवळ मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानेच काम भागणार नाही. ते तेव्हाच शक्य होईल जेव्हा त्याला असा बोध होईल की देवांच्या सुंदर, आकर्षक सुखाने आत्मकल्याण होणार नाही. सांसारीक वैभव, संपत्ती, सत्ता यांद्वाराही मनुष्य आपले हित साधू शकणार नाही. वास्तविक कल्याण तर आपल्या आत्मस्वरूपाला समजल्याने होईल. तसे ज्ञान व तशी अनुभूती प्राप्त झाली तर जीवनाच्या जास्तीत जास्त समस्यांचे समाधान निश्चित होईल, परंतु असे ज्ञान प्राप्त होणे, बोधी मिळणे अत्यंत दुर्लभ आहे, कठीण आहे. परंतु मानवाने जर प्रयत्न केला तर त्याला जगातील दुर्लभ गोष्टही सुलभ होते.
__ असा विचार करून मनुष्याने आपल्या चिंतनधारेला अजून पुढे वाढवायला पाहिजे आणि दुर्लभ बोधी सुद्धा प्राप्त करण्याचा संकल्प केला पाहिजे. जर बोधी प्राप्त झाली नाही तर पुन्हा पुन्हा चौऱ्यांशी लाख योनीत भ्रमण करावे लागेल. असे ज्ञान प्राप्त केले पाहिजे की ज्याने भवभ्रमणाचा अंत होईल.
बोधीचा अर्थ 'सम्यकदर्शन' आहे. सम्यक्दर्शन प्राप्त झाल्याशिवाय धर्माराधना आध्यात्मिक साधना काहीच सम्यक् म्हणजे योग्य त-हेने होऊ शकत नाही. मानवाने ह्याचा पुन्हा पुन्हा विचार केला पाहिजे. ह्याने मिथ्यात्व, मोहनीय कर्म क्षीण होण्यात सहायता मिळते.
बोधीला रत्नाची उपमा दिली आहे. रत्न संसारातील एक बहुमूल्य वस्तू आहे. ज्याप्रमाणे संसारी लोकांना रत्नप्राप्ती अत्यंत दुर्लभ आहे तरी त्याला मिळविण्यासाठी रात्रदिवसच प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे बोधिरत्नाचे महत्त्व समजले पाहिजे. रत्नापेक्षाही
पानाचा दुर्लभता अनंत गुणांनी अधिक आहे. कारण ते प्राप्त झाल्यावर जीवनधारा बदलून जाते. म्हणून आगमामध्ये चार दर्लभ पदार्थात सम्यक् बोधी मिळणे दुर्लभ आहे
असे सांगितले आहे.६१
होतात कारण लोकांची तत्त्वरूची कमी झाला
मोक्षमार्गाचा सत्यमार्ग जाणणारे लोकही कधी कधी मार्गच्यूत होतात, श्रद्धाभ्रष्ट " लोकाची तत्त्वरूची कमी झाली आहे. तत्त्वरूची निर्माण होणे ही अत्यंत ..