________________
(१०५)
'लोक'चे अधः, मध्य आणि उर्ध्य असे तीन भाग आहेत. मध्यबिंदु मेरू धर्मताच्या मूळामध्ये आहे. मेरूपर्वताच्या समतलाच्या खाली एक हजार योजनांमध्ये नऊशे योजनांच्या खाली अधोलोकाची सुरुवात होते आणि सातव्या नरकापर्यंतच्या लोकक्षेत्राला "अधोलोक' म्हणतात, जो उलट्या पणतीसारखा अर्थात खालचा भाग विस्तृत आणि वरचा भाग आखुड असा आहे.
namw
मेरू पर्वताच्या नऊशे योजनेखाली आणि नऊशे योजनेबर एकूण अठराशे योजने उंचीचा मध्यलोक आहे, ज्याचा आकार झालरीसारखा आहे. ज्याची लांबी आणि रूंदी दुसऱ्या सुलट सारखीच आहे म्हणजे प्रथम उलट्या पणतीसारखा वरचा भाग लहान आणि ठेवलेल्या पणतीसारखा तळाचा भाग लहान असा मध्यलोक आहे ह्याचा विस्तार एक रज्जू प्रमाण आहे.
उर्ध्वलोकाचा आकार मृदुंगासारखा आहे. मेरूपर्वताच्या समतलापासून नऊशे योजनांच्या वरचे संपूर्ण क्षेत्र मुक्तीस्थान अर्थात सिद्धशिलेपर्यंतच्या क्षेत्राला 'उर्ध्वलोक' म्हणतात. भगवती सूत्रामध्ये लोकाच्या आकाराला सुप्रतिष्ठ संस्थानिक म्हटले आहे. अर्थात जमिनीवर एक पणती उलटी त्याच्यावर दुसरी पणती सुलटी आणि त्याच्यावर तिसरी पणती उलटी ठेवल्याने जो आकार बनतो तोच आकार लोकाचा आहे. ५९
तोकाचा एकदम खालचा भाग जेथे सातवा नरक आहे. तो सात रज्जु रुंद आहे आणि तेथून कमी होत होत सात रज्जू उंचीवर जेथे दोन पंत्याचे संधीस्थान आहे तेथे मध्यलोक आहे, त्याची रुंदी एक रज्जू आहे. तेथून पुढे क्रमाने वाढत वाढत पाचव्या देवलोकाजवळ जो मध्यलोकापासून जवळ जवळ तीन रज्जू उंच आणि पाच रज्जू रुंद आहे. नंतर क्रमाने कमी होत होत साडेतीन रज्जू उंचीवर जेथे तिसऱ्या पणतीचा शेवटचा भाग म्हणजे सिद्धशीला आहे तेथे एक रज्जू रुंदी आहे. अशाप्रकारे ह्या संपूर्ण लोकाची उंची चौदा रज्जू आहे. आणि रुंदी जास्तीत जास्त सात रज्जु आणि कमीत कमी एक रज्जू आहे..
जैन धर्मग्रंथात लोकाच्या स्वरूपाचे आकार, लांबी, रुंदी इत्यादींचे विस्तृत विवेचन प्राप्त होते.
चारा वैराग्य भावनेमध्ये लोकभावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण ज्यांची आपल्या आत्म्यावर श्रद्धा आहे तो लोकावर श्रद्धा ठेवतो. आणि लोकस्वरूपाचे चिंतन आपल्याला आत्मस्वरूपाच्या चिंतनाकडे वळविते.