________________
ERVash
व आत्म्याची ती शुद्ध स्थिती आहे जी कर्माच्या येणाऱ्या प्रवाहाला अथवा
आबाला अडविते.
MINISTRY
आचार्य उमास्वातींनी 'तत्त्वार्थसूत्रा'मध्ये ह्याची परिभाषा व लक्षण यांचे वर्णन करताना लिहिले आहे की 'आस्रव निरोध संवरः' अर्थात आसवाचा निरोध करणे म्हणजे
संघर आहे.५२
SHARE
ड
जसे पूर्वी एका श्लोकामध्ये सूचित केलेले आहे की आस्रव आणि संवर हीच दोन मुख्य तत्त्वे आहेत, ज्याच्यावर जैन दर्शनाचा साधना मार्ग उभा आहे. मोक्षमार्गाची समस्या अथवा अडथळा आस्रव आहे. आणि त्याचे समाधान संवर आहे.
'कत्स्न कर्मक्षयो मोक्षः'५२ अर्थात सर्व कर्म क्षीण होणे अथवा क्षय होणे म्हणजे मोक्ष आहे. तत्त्वार्थसूत्रामध्ये हा जो उल्लेख झाला आहे त्याचे तात्पर्य हे आहे की जेव्हा स्य कर्माचा क्षय होतो तेव्हा संसारी जीव संसारातून, जन्ममृत्यूच्या चक्रातून, सर्व भौतिक सुखदुःखापासून मुक्त होतो. त्याचे अनादी काळाचे बंधन तुटते.
. ज्याप्रमाणे तुरुंगात बंद असलेला पुरुष सुटल्यावर जसा प्रसन्न होतो त्याचप्रमाणे आत्मा कर्मबंधनातून सुटल्यावर आपल्या शुद्ध स्वरूपात येतो. तो अनंत, असीम आणि अव्याबाध आनंदात मग्न होतो. साधकाने सर्वप्रथम अशुभ संवरण केले पाहिजे. क्रोध, घृणा, ईया, काम, राग, द्वेष, संग्रह इत्यादींचा निरोध करणे आवश्यक आहे, त्याचबरोबर 'शुभ'चा सुद्धा अवरोध केला पाहिजे. जसे आस्रवभावनेमध्ये सांगितले आहे की, हे सर्व संवराद्वारे सिद्ध होते. संवर ही आत्म्याची शुद्ध प्रवृत्ती आहे, ज्याच्यात निवृत्तीचा समावेश आहे. येथे एक प्रश्न निर्माण होतो की संवर तर निरोध आहे त्याला प्रवृत्ती कसे म्हणता येईल ? यथ हे जाणण्यायोग्य आहे की प्रवृत्तीला थांबविण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो, उद्यम करावा लागतो त्याला आंतरीक दृष्टीने प्रवृत्ती म्हटले तर अयोग्य वाटत नाही.
संवराच्या ह्या स्वरूपाचे पुन्हा पुन्हा चिंतन, मनन करणे, अभ्यास करणे ही संवर भावना आहे. आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाकडे जाण्याचा हा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहे.
समुद्रातले जहाज छिद्र बंद असल्याने, पाणी आत न घुसल्याने निर्विघ्नपणे सागर पार करते त्याचप्रमाणे जीवरूप जहाज आपल्या शुद्ध आत्मज्ञानाच्या बळावर इंद्रिय इत्यादी आवरूपी छिद्रांना बंद केल्यानंतर कर्मरूपी जल न घसल्याने केवलज्ञान इत्यादी अनेक गुणरत्नाने संपूर्ण मुक्ती स्वरूप किनाऱ्याला निर्विघ्नपणे प्राप्त होते. अशा संवरभावनेच्या